पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करताना सर्व राजकीय नेते विरोधकांवर टीका-टिपण्णी करताना दिसत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन झाल्यानंतर पूर्वीचे राजकीय वैर असलेले नेत्यांशी जुळवून घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रयत्न सुरु आहेत.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हर्षवर्धन पाटलांचा रुसवा, विरोध अद्यापही गेलेला नाही. म्हणून पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांचा राग शांत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येत्या गुरुवारी ‘जनसंवाद सभा’ घेतली जाणार आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अजित पवार यांनी या दोघांच्याही विरोधाची धार कमी करण्यास सुरुवात केली आहे. इंदापूर येथे महायुतीची सभा घेऊन फडणवीस यांनी मने जुळल्याचे भासविल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सासवडमध्ये जनसंवाद सभा घेतली जाणार आहे. या सभेत एकनाथ शिंदे हे अजित पवार आणि शिवतारे यांच्यातील दिलजमाईचे कशी करवणार हे पाहणं सर्वांसाठीच औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पाणी देण्यासाठी धमकावलं! शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांचा जोरदार पलटवार
-ऐनवेळच्या ठरावाची माहिती का लपवली जाते?; ‘आप’ची राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार, केली ‘ही’ मागणी
-“नातं हे नात्याच्या जवळ ठीक, पण अजितदादा एखादी भूमिका घेतात तेंव्हा…” सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या
-भोसरीत आढळरावांच्या पाठीशी लांडगे अन् लांडेंची ताकद! विलास लांडेंच्या भेटीनंतर आढळरावांचे पारडे जड