पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुण्यात महत्वाची बैठक घेतली. या बैठकीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिला उमेदवार घोषित करण्यात आला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना उमदेवारी देण्यात आली आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला. त्याबाबतची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. येत्या २८ तारखेला महायुतीचा संपूर्ण फॉर्म्युला जाहीर केला जाणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं आहे.
“पुण्यातील आजच्या बैठकीत बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. परभणीचा उमेदवार २ दिवसात ठरणार आहे. या बैठकीत बारामती लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचच लढवणार, असल्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. महादेव जानकरांना पाठिंबा ही केवळ अफवा असून विरोधकांनी पसरवली आहे,” अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली आहे.
“एकत्रित चर्चा करुन महायुतीत जागावाटपाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र २८ तारखेला मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर करणार आहे. रायगडमधून सुनील तटकरे निवडणूक लढविणार आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील २०वर्षांपूर्वी आमच्या पक्षातून शिवसेनेत गेले होते. ते आमचे शिरुरचे उमेदवार असणार आहेत. इतर उमेदवारांची नावे २८ तारखेला जाहीर करण्यात येतील”, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
“कारण नसताना पत्रकारांनी राष्ट्रवादीला तीन – किंवा चारच जागा लढविण्यास मिळणार अशा खोट्या बातम्या चालवल्या. प्रत्येक मंत्र्यावर एका लोकसभा मतदारसंघाची तर प्रत्येक आमदारावर एका विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असेल. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे आहे. बारामतीचा उमेदवार २८ तारखेला जाहीर करतो. तुमच्या मनातील उमेदवार जो उमेदवार आहे, तोच आमचा उमेदवार असेल.. सातारची जागा अजून जाहीर झालेली नाही. छत्रपती उदयनराजे भोसलेंना सांगण्याचे काम भाजपचे नेते करतील. शिवतारेंबाबत नो कॉमेंट्स”, असं म्हणत अजित पवारांनी बैठकीत झालेल्या चर्चांबाबत माध्यमांशी संवाद साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Summer | पुण्यात उष्णतेचा तडाका वाढला, पारा ४१ डिग्रीच्यावर; अशी घ्या काळजी
-बारामतीसाठी महायुतीकडून महादेव जानकरांना उमेदवारी? अजित पवारांची पुण्यात महत्वाची बैठक
-पुण्यात घर खरेदीची संख्या वाढली; पुणेकरांची ‘या’ घरांना सर्वाधिक पसंती