पुणे : लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू झालेली असताना अवैध व्यवसाय आणि कामांवर पोलिसांची करडी नजर आहे. पिंपरी-चिंचवडमधील मावळ लोकसभा मतदार संघात ३० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने (SST) ही धडक कारवाई केली आहे, एका कारमधून सुमारे ३० लाख रुपये जप्त केले आहेत.
एएनआय दिलेल्यानुसार, पुढील तपासासाठी ही रोकड आयकर विभागाकडे सोपविण्यात आली आहे. याबाबतचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये पोलीस अधिकारी आणि एसएसटी कारची तपासणी करताना दिसत आहेत, ज्यातून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
#WATCH | Pune | The Static Surveillance Teams (SST) seized Rs 29 lakh 50 thousand from a car in the Maval Lok Sabha constituency, in Pimpri Chinchwad. The cash has been handed over to the Income Tax department for further probe: EC officials pic.twitter.com/caAjRhCEUU
— ANI (@ANI) May 1, 2024
निवडणुकीच्या वेळी मतदारसंघात प्रचारासाठी होणारा अतिरेकी खर्च, रोख स्वरूपात लाचेचे वाटप, असामाजिक घटक किंवा अवैध शस्त्रे, दारुगोळा आणि दारूची वाहतूक यावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध पथकं तयार केली जातात. यापैकी एक पथक म्हणजे स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, ज्यात एक मॅजिस्ट्रेट आणि प्रत्येक टीममध्ये तीन किंवा चार पोलिस कर्मचारी असतात जे नेमून दिलेल्या चेकपोस्टवर काम करतात.
महत्वाच्या बातम्या-
-मोदींना साथ देणारा नेत्याची गुगली, म्हणाले ” मी शरद पवारांना रोज भेटतो आत्ता…”
-“भोर वेल्ह्याचं ताट येऊ द्या हा वाढपी त्यात जास्तच टाकणार, अन् नाही टाकलं तर…” -अजित पवार
-‘पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल’; मुरलीधर मोहोळांचं आश्वासन