पुणे : उपमुख्यमत्री अजित पवार हे महायुतीसोबत गेल्यापासून भाजपचे अनेक राजकीय विरोधक हे अजित पवारांच्या जवळ आले आहेत. गतनिवडणुकीत आमदार राहुल कूल यांच्या पत्नी कांचन कूल या विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यावेळी पवार कुटुंब आणि कूल कुटुंब हे एकमेकांविरोधात आमनेसामने आले होते, मात्र आता राजकीय समीकरणं बदलली आणि कूल-अजित पवार कुटुंब हे एकत्र आले.
‘आतापर्यंत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो, पण राजकीय समीकरणं बदलत असतात असं सांगत राहुल कुल राष्ट्रवादीत येऊ दे, उद्याच त्याला मंत्री करतो असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. आपला शब्द म्हणजे शब्द, फडणवीसांना सांगतो राहुलला मंत्री करा’, असंही अजित पवार म्हणाले आहेत. दौडमधील सभेत अजित पवार बोलत होते.
🔰25-04-2024 🛣️ दौंड, जि. पुणे ⏱️ बारामती लोकसभा मतदारसंघ | महायुती उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा https://t.co/Qo7qdvfUQG
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 25, 2024
“कांचन कुल काही बाहेरच्या नाहीत, त्या आपल्या घरच्याच आहेत. मागे काय झाले ते गंगेला मिळाले, हलक्या कानाचे राहू नका. मागे खासदार संसदेत गेले, ते भाषण करायचे. भाषण करून आर्थिक संपन्नता येणार नाही, आपले प्रश्न सुटणार नाही. मी राहुलला आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. राहुलला घड्याळमध्ये यायला लावा, उद्या मंत्री करतो. येतोय का बघ, उद्या मंत्री आपण करणार. उद्या मी फक्त फडणवीस यांना सांगेल की, पोरगा चांगला आहे, त्याला मंत्री केलं तर आमदार वाढतील”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘महायुतीची वज्रमूठ दिवसेंदिवस घट्ट होतेय, आपणही मतदान करून सामील व्हावे’; सुनेत्रा पवारांचे आवाहन
-मावळमध्ये संजोग वाघेरेंना शह देण्यासाठी नाशिकच्या संजय वाघेरेंची एन्ट्री!
-बिग बॉस फेम मीरा जगन्नाथचे हॉट फोटोशूट; नेटकऱ्यांनी केले जोरदार कौतुक!
-हजारोंची गर्दी अन् दिग्गजांची उपस्थिती! आढळराव पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
-उन्हाळ्यात सोडा पिण्याचे प्रमाण वाढले असेल तर सावधान; पडू शकता ‘या’ गंभीर आजारांना बळी