पुणे : पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस ड्रग्जचे प्रकरण वाढताना दिसत आहे. शहरातील मध्यवर्ती भागात एफसी रोडवरील असणाऱ्या एल थ्री बारमध्ये २ तरुण अंमली पदार्थांचे सेवन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचे सर्व स्तरातून पडसाद उमटले. राजकीय वर्तुळात देखील या मुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले. या सर्व प्रकरणावरुन राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय राज्यमंत्री पुणे शहराचे खासदार केंद्रीय सहकार आणि हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे.
पुणे शहरात ड्रग्सचा साठा आढळल्यावर पोलिसांनी कारवाई केली. पण ती कारवाई म्हणजे एक नाटक होतं. राजकारण्याचं पाठबळ आणि पोलिसांची मदत असल्याशिवाय ड्रग्सचा व्यवहार होईल असे वाटत नाही, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या टीकेवर आता मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिले आहे.
‘आपल्याला काहीतरी वाटतं म्हणून उगाचच बोलायचं, कोणत्याही विषयावर बोलताना आपल्या हातामध्ये पुरावा असला पाहिजे. काही तरी संदर्भ ठोस असले पाहिजे. उगाचच रोज उठायच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर टीका करायची, विरोधासाठी विरोध करायचा, हे राज्यातील जनता सर्व पाहत आहे. त्यामुळे विरोधकांनी वैयक्तिक आकसासाठी बोलायचं थांबवा, शहरातील किंवा बाहेरच्या नेत्यांनी माझ्या शहराचं नाव कोणीही खराब करू नये’, असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी संजय राऊत यांच्या टीकेला सणसणीत उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; भाजपच्या ‘या’ नेत्यांची विधान परिषदेवर लागणार वर्णी!
-पुणे ड्रग्ज: शहरातील अनधिकृत पब्ज आणि बारच्या कारवाईवर सौरभ गोखलेची प्रतिक्रिया
-पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार, मोहोळांचा दिल्ली दरबारी पाठपुरावा यशस्वी
-संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; वारकरी विठुनामात तल्लीन