पुणे : विधानसभा निवडणूक निकालानंतर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील पालकमंत्र्यांची नावे निश्चित झाली नव्हती. यावरुन विरोधकांनी अनेकदा सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. राज्य सरकारच सामान्य प्रशासन विभागाने रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. रोहित पवार यांनी याबाबत सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
“काम कमी नखरा जास्त”
‘या सरकारची ‘कामे कमी आणि नखरे जास्त’ अशीच काहीशी स्थिती आहे. तिन्ही पक्षांना त्यांना स्वतःला अनपेक्षित बहुमत मिळूनही निकालानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी १२ दिवसांनी, मंत्रिमंडळ विस्तार २२ दिवसांनी, खातेवाटप ३० दिवसांनी तर पालकमंत्री वाटप तब्बल दोन महिन्यांनी झाले. त्यातही आता रायगड, नाशिकच्या पालकमंत्री वाटपावरून वाद निर्माण झाल्याने २४ तासाच्या आत सरकारला नवीन GR काढावा लागला’, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
या सरकारची ‘कामे कमी आणि नखरे जास्त’ अशीच काहीशी स्थिती आहे. तिन्ही पक्षांना त्यांना स्वतःला अनपेक्षित बहुमत मिळूनही निकालानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी १२ दिवसांनी, मंत्रिमंडळ विस्तार २२ दिवसांनी, खातेवाटप ३० दिवसांनी तर पालकमंत्री वाटप तब्बल दोन महिन्यांनी झाले.…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 20, 2025
“सरकारमध्ये एकीकडे कोण आंदोलन करतंय तर कोण नाराज होऊन गावाला जातंय, तर दुसरीकडे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री दावोसला सुद्धा एकत्र जात नाहीत. शिवाय उद्योगमंत्र्यांची दावोसची हॉटेल रूमसुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाने बुक केली. एवढी टोकाची अनागोंदी आणि अविश्वास या सरकारमध्ये आहे”, असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बायको प्रेग्नंट, तरीही नवऱ्याने अविवाहित म्हणत डॉक्टर तरुणीसोबत…; पुण्यात धक्कादायक प्रकार
-‘…तर परळीत येऊन बसेन आणि लोकशाही मार्गाने धडा शिकवीन’; देसाईंचा मंत्री मुंडेंना इशारा
-‘…म्हणून सैफ अली खान प्रकरणाला वेगळं वळण’; रोहित पवारांचा गंभीर आरोप
-मुंढव्यातील ‘त्या’ हुक्का पार्लरवर छापा; हॉटेल मालकासह व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल
-राज्य मंडळाकडून ‘जात प्रवर्ग’चा निर्णय रद्द; 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नवे हॉल तिकीट