पिंपरी चिंचवड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जगताप या दीर-भावजईमध्ये वाद सुरु आहे. चिंचवड विधानसभेची उमेदवारीवरून विद्यमान आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप या दीर-भावजयांमध्ये लक्ष्मण जगतापांचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरून वादविवाद सुरू आहे. हा वाद आणखी शमला नाही. तोच यामध्ये आणखी एकाने उडी घेतली आहे.
चिंचवडचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक शत्रुघ्न काटे यांची ओळख आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण जगताप यांची पत्नी आणि बंधू या दीर-भावजईमध्ये उत्तराधिकारी कोण यावरुन वाद सुरु असताना या वादात काटेंनी देखील उडी घेतली आहे.
काय म्हणाले शत्रुघ्न काटे?
‘मी विधानसभा लढण्यावर ठाम आहे, असे म्हणत शत्रुघ्न काटे यांनी चिंचवडमध्ये बंडखोरी करण्याची तयारी दर्शवली आहे. काटेंनी समर्थकांसोबत बैठक घेऊन, याची घोषणा केली. आज लक्ष्मण भाऊ असते तर त्यांनी मलाच त्यांचे राजकीय उत्तराधिकारी बनवलं असतं’, असा दावा ही काटेंनी केला आहे.
आमच्या प्रभागाची मिटींग झाली त्या मिटींगमध्ये ठरले आहे. आगामी विधानसभेची निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहे. गेली १२ वर्षे भाजपचा कार्यकर्ता आहे. २ टर्म मी नगरसेवक राहिलो आहे. मी भाजपचे तिकिट मागत आहे आणि त्याच तिकिटावर मी लढवणार आहे. चिंचवड मतदारसंघात २००९ सालापासून लक्ष्मण जगतापांसोबत मी प्रचार प्रमुख, निवडणूक प्रमुख म्हणून काम केले आहे. मला या संपूर्ण मतदारसंघाची व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे मला असे वाटते की, आतापर्यंत मला दोनदा पक्षाने डावलले आहे पण आता मला डावलेल असे मला वाटत नाही’, असे म्हणत निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे शत्रुघ्न काटे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीच्या राजकाणात मोठी घडामोड; काका-पुतणे येणार आमनेसामने, नेमकं काय प्रकरण?
-पुणेकरांसाठी आणखी एक ‘गुड न्यूज’; स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम पूर्णत्वास!
-शरद पवारांच्या मोदी बागेत सुनेत्रा पवारांची भेट; नेमकं कारण काय? राजकीय चर्चेला उधाण