बीड : ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे हे अभिवादन यात्रा करत आहेत. ही यात्रा पहाटे ४ वाजता भगवानगडावर पोहचली. आजपासून पुढे पश्चिम महाराष्ट्रामधे होणारा प्रवास आता स्थगित करण्यात आला आहे. याबाबत आता लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“‘अभिवादन यात्रा’ स्थगित करण्यात आलेली नाही. आमचा पहिला टप्पा होता, तो आम्ही टप्पा पूर्ण केलेला आहे. तो चौंडी हे तिर्थक्षेत्र त्यांच्या मधल्या ऊर्जा स्थळांना भेटी देणार आहोत. त्यामुळे इतर भागही कव्हर करणार आहोत. कारण आमची अभिवादन यात्रा जवळपास १० ते १२ तास उशिरा झाली. आम्ही ज्या भगवान गडावर रात्री ७ वाजता पोहणार तिथे आम्हाला पोहोचायला साडे ५ वाजले. त्यामुळे आम्ही जी परिक्रमा यात्रा घेतली त्यामध्ये हजारोंचा जनसमुदाय आहे. त्यामुळे ही यात्रा स्थगित नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण ताकदीने या महाराष्ट्रामध्ये झालेली दिसेल उभी राहिलेली दिसेल”, असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
लक्ष्मण आखे ३६८ किलोमीटर अंतरावरून सांगोलावरून वडीगोद्रीला अंबडकडे गेले होते. त्यामुळे माझ्या भागामध्ये येऊन मी माघार शक्यच नाही, कारण आम्ही लोकशाहीतली संविधानाची लढाई लढतोय. त्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही. मनोज जरांगेंना भुजबळ नावाची कावीळ झाली आहे. त्यामुळे त्यांना कुठलेही चित्र हे फक्त भुजबळांचे दिसत आहे. त्यांनी इथून पुढच्या कालावधीमध्ये एका चांगल्या प्रकारे जाऊन इलाज घेतला पाहिजे. नाहीतर ही कावीळ अशीच वाढत गेली तर मग काय होतं, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राला माहिती आहे. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला जरांगे पटलांनी घ्यावा आणि चांगली ट्रीटमेंट डोक्यावरती करून घ्यावी, अशी माझी त्यांना विनंती आहे”, असेही लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘अजित पवार गटाच्या २२ आमदारांनी शरद पवारांशी संपर्क साधला, पण…’; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
-‘…अन् ते ऐकून मी कपाळावर हात मारला’; अजित पवारांनी सुरेश धस यांच्याबाबत असं काय सांगितलं?
-‘हमाल, कष्टकरी माथाडी कायद्याची अंमलबजावणी करा, अन्यथा…’; बाबा आढावांचा राज्य सरकारला इशारा
-पुण्यात पालखी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज; ५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
-‘अजित पवारांनी अन्याय केला की नाही? हे सगळ्यांना माहिती आहे, इंदापूरच्या जागेचा….’- हर्षवर्धन पाटील