पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपकडून कोणाला संधी मिळणार ही चर्चा सुरू असतानाच मेधा कुलकर्णी यांना मिळालेल्या राज्यसभेच्या संधीमुळे राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. भाजपचे संख्याबळ पाहता कुलकर्णी यांची खासदारकी निश्चित झाली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे पुणे लोकसभेची राजकीय गणितेदेखील बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कसबा पोटनिवडणुकीमध्ये ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याचा सुर पहायला मिळाला. त्यामुळे लोकसभेला कुलकर्णी यांचे नाव देखील आघाडीवर होते, मात्र आता ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व मिळाल्याने लोकसभेसाठी भाजप सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला वापरत मराठा चेहरा देणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
आगामी काळात होणाऱ्या लोकसभेसाठी पुण्यातून माजी आमदार जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे हे तीन मराठा चेहरे प्रामुख्याने उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. याशिवाय माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनीही जोरदार तयारी केली आहे. मात्र, आता राज्यसभेसाठी मेधा कुलकर्णी यांच्या निमित्ताने भाजपने राज्यसभेसाठी ब्राह्मण उमेदवार पुढे केला आहे. त्यामुळे हे गणित बघता पुन्हा लोकसभेसाठी सुनील देवधर यांना संधी दिली जाणार का? हा प्रश्न आहे.
मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीमुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचेही गणितही पुढे आले आहे. कोथरूडचे विद्यामान आमदार असलेले चंद्रकांत पाटील हे राज्यात मंत्री आहेत. त्यात आता कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यापण आता खासदार होणार आहेत. याच मतदारसंघात भाजपनं मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने महापौरपद, स्थायी समिती अध्यक्ष दिले होते. ही सर्व गणितं बघता आता मुळीक यांना खासदारकीची उमेदवारी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांची जय्यत तयारी; शहरात फिरु लागला ‘विकासरथ’
-‘संघर्षाच्या वेळी त्यांची आठवण येते’; आर. आर. आबांच्या स्मृतीदिनी सुप्रिया सुळे भावूक
-मेधा कुलकर्णींच्या राज्यसभेमुळे मोहोळांचा मार्ग मोकळा, नेमकं गणित काय?
-बारामती मतदारसंघातून महत्वाची अपडेट; सुनेत्रा पवार कांचन कुल यांच्या भेटीला