बारामती | पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या असून सोमवारी प्रचाराच्या सांगता सभा पार पडल्या. राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणारा बारामती मतदारसंघातही सांगता सभा पार पडल्या. मतदानाला आता फक्त आजचा दिवस बाकी आहे. उद्या बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारसंघात मोठ्या नाट्यमय घडामोडींना सुरवात झाली आहे. बारामतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री उशिरा पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे शरयू मोटर्सचे मालक असून बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगता सभा झाल्यानंतर रात्री उशिरा शरयू मोटर्समध्ये पोलिसांकडून तापसणी करण्यात आली. पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. पोलिसांकडून सर्च ऑपरेशनमुळे आता मतदारसंघात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या सर्व प्रकरणावर युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘शरयू मोटर्समध्ये चौकशी केली. तपासणी केली असता पोलिसांना काहीही सापडलं नाही. असं सर्च ऑपरेशन आतापर्यंत कधीच राबवलं नाही. पहिल्यांदाच अशी तपासणी करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान मतदानाच्या आदल्या दिवशीच या घाडमोडी घडल्याने बारामतीत चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
-महायुतीची एकजूट: हेमंत रासनेंना विजयापर्यंत नेणार; महायुतीचे कार्यकर्ते जोमात
-पुण्यात पैसे, सोन्याने भरलेला ट्रक त्यानंतर आता सापडलेल्या ट्रकमध्ये काय सापडलं?
-टेक्सटाईल पार्कमध्ये प्रतिभा पवारांना जाण्यापासून अडवलं; अजित पवार म्हणाले, ”काकी माझ्या…’
-‘देशात बारामतीची ओळख कोणामुळे हे सगळ्यांना माहितीये’; सांगता सभेतून शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा