पुणे : पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अमली पदार्थांचे सेवन तस्करी तसेच नाईट लाईफ यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. तसेच गेल्या काही दिवसांत अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या २ तरुण मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्याची चर्चा संपतही नाही तोच आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. दुसऱ्या व्हिडीओमध्ये २ तरुणी एका मॉलमधील टॉयलेटमध्ये जाऊन अमली पदार्थाचे सेवन करातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलीस प्रशासन सज्ज झाले असून प्रशासनाने शहरातील अनधिकृत बार, पबवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पुणे महानगरपालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागातील अतिक्रमण विभागाची अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई सुरु आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील जे. एम. रोडवरील चौपाटी महापालिकेच्या बांधकाम विभागाने उद्धवस्त केली आहे.
एफ. सी. रोडवरील एल थ्री बारमधील ड्रग्ज पार्टीनंतर महापालिकेने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्याच आता पुणे महापालिकेकडून आज सलग ११ व्या दिवशी कारवाई सुरु आहे. जंगली महाराज रस्त्यावरील पाषाणकर ऑटो समोर खाजगी जागेत खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते. ते देखील महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तोडण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-धीरज घाटेंचे राजकीय आचरण मनोरूग्णासारखे, तत्काळ गुन्हा दाखल करा; काँग्रेसची मागणी
-वसंत मोरे आता वंचितलाही करणार ‘जय महाराष्ट्र’; पुण्यातील विधानसभेच्या २ मतदारसंघावर केला दावा
-पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालच्या अटकेची माहिती लपवली; नेमकं कारण काय?
-महायुतीत इंदापूरच्या जागेवरुन वाद?; हर्षवर्धन पाटील अन् दत्ता भरणेंमध्ये बॅनर वॉर