पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या माध्यमातून राज्यातील महिलांना प्रतिमहिना दीड हजार रुपये दिले जात होते. गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपयांप्रमाणे प्रति महिना पैसे जमा झाले. मात्र, फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी जमा होणार? असा प्रश्न पडला आहे. अशातच आता महिला बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी
मार्च महिन्याचा हप्ता विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर विभागाला निधी प्राप्त होणार आहे. त्यातूनच महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे लाडक्या बहिणींना मार्च महिन्यात दोन्ही हप्त्यांचे मिळून ३ हजार रुपये मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त राज्य सरकारकडून गिफ्ट देण्यात येणार आहे.
लाडकी बहिण योजनेतून डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात 24 तारखेला देण्यात आला होता. पण फेब्रुवारी महिन्यातील पैसे जमा न झाल्याने विरोधकांनी राज्या सरकारवर टीकेची झोड उठवली होती. पण आता 8 मार्च रोजी म्हणजेच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्यांचे पैसे मिळतील. आणि मार्च महिन्याचे पैसे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळतील, म्हणजेच जागतिक महिला दिनी 1500 महिलांना मिळणार असल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-लॉजवर महिलांचे छुपे व्हिडिओ काढायचा अन् मग… पोलिसांनी नराधम दत्ता गाडेची कुंडली काढली
-काय करायचं ते कर पण… स्वारगेट प्रकरणात धक्कादायक माहिती, पीडितेने जबाबात सगळं सांगितलं
-स्वारगेट अत्याचार प्रकरणी महिला आयोगाची महत्वाची बैठक; चाकणकर काय म्हणाल्या?
-स्वारगेट अत्याचार: आरोपीच्या जाबाबातून धक्कादायक माहिती समोर; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
-‘मी अत्याचार केला नाही, आमच्यात सहमतीने संबंध झाले’; दत्ता गाडेचा पोलिसांसमोर धक्कादायक दावा