पुणे : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आता महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली असून आतापर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींना या योजनेतून ६ हफ्त्यांचे एकूण ९ हजार रुपये मिळाले आहेत. या योजनेतून डिसेंबर महिन्यात तब्बल २ कोटी ५२ लाख महिला लाभार्थ्यांना हफ्त्याची रक्कम देण्यात आली. त्यानंतर आता महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे कधी जमा होणार, असा प्रश्न पडला होता. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांचं लाडकी बहीण योजनेसंदर्भातील वक्तव्य देखील चर्चेत आहे.
‘ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी स्वत:हून या योजनेतून नाव काढून घ्यावं. महिलांना आतापर्यंत जेवढी रक्कम देण्यात आली ती परत मागण्यात अर्थ नाही. आतापर्यंत जे दिलं ते महिलांना अर्पण केलं असं समजू मात्र ज्या महिला पात्र नाहीत त्यांनी स्वत: हून नावं काढून घ्यावीत, अन्यथा दंडासह वसुली केली जाईल, असे छगन भुजबळ म्हणाले होते.
राज्य सरकारनं डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम २४ डिसेंबरपासून वर्ग करण्यास सुरुवात केली होती. मात्र, भुजबळांच्या वक्तव्यानंतर आता जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार का? हे पाहावं लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा सुपडा साप करणार’; शंकर जगताप यांचा विश्वास
-पुण्याच्या बहाद्दराची कमाल, लग्नाच्या अमिषाने २५ महिलांना लावला चुना; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
-राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? शरद पवारांच्या निकटवर्तीयाचं मोठं वक्तव्य