पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. पुणे शहर पोलिसांकडून कडक नियम घातले जात आहेत. पुणे शहर पोलिसांकडून या गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी अनेक पावलं उचलली जात आहेत. मात्र तरीही गुन्हेगारांना काही घाम फुटेना. दिवसातून ३ ते ४ घटना गुन्हेगारीच्या घडलेल्या दररोज पहायला मिळत आहे.
शहरातील येरवडा परिसरातील पांडुलमाण वस्तीत ६ जणांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवल्याचा प्रकार आता पुन्हा एकदा समोर आला आहे. आरोपींनी कोयते व दगडाच्या साहाय्याने परिसरातील रिक्षा, मोटारींची तोडफोड केली. आरोपींनी हवेत कोयते फिरवून परिसरात दहशत निर्माण केल्याचंही पहायला मिळालं आहे. नागरिकांना धमकीही दिली. याप्रकरणी आरोपी सोहम शशी चव्हाणसह ५ अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगनू राकेश परदेशी यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
या घटनेमुळे नागरिकांनी घराचे दरवाजे बंद केले. आरोपींनी अमित सोनकर नावाच्या व्यक्तीला हाताने मारहाण केली. या प्रकरणाचा अधिक तपास येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे करीत आहेत.
येरवड्यातील लक्ष्मीनगरसह पांडुलमाण वस्ती, कामराजनगर, गणेशनगर, कंजारभाट वस्ती, यशंवतनगर, विश्रांतवाडी भीमनगर अशा ठिकाणी गांजा विक्री मोठ्या प्रमाणात होते. रात्रभर हा प्रकार सुरू असतो. यावर पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय कारवाई करतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याची गुन्हेगारी थांबणार कधी?; पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
-‘भाजपला विजयाचा आत्मविश्वास राहिला नाही, नेत्यांमध्ये अहंकार वाढला’; सुप्रिया सुळेंचा आरोप
-शिरुरच्या जागेवरून युतीत मिठाचा खडा! आढळरावांनी अजितदादांना ठणकावून सांगितलं
-‘राजकारण म्हणजे भातुकलीचा खेळ नाही, मी कुटुंबात राजकारण आणत नाही’; सुप्रिया सुळेंचा पलटवार
-धक्कादायक! पोलीस स्टेशनसमोर पेटवून घेतलेल्या त्या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी