पुणे : पुणे शहरातील कोथरुड डेपो परिसरातील मोकाटेनगरमध्ये एका इमारतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मोकाटेनगरमधील पाले इमारतीमध्ये एका फ्लॅटमधील महिला बाथरुमध्ये अडकली. बराच वेळ बाथरुमध्ये अडकल्याने घरात कुकर ठेवलेला गॅस चालूच होता. परिणामी कुकरचा स्फोट होऊन गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता, परंतु योग्य वेळेत मदतीला कोथरूड अग्निशमन दलाचे जवान धावून आले. त्यांनी मदत केली त्यामुळे मोठी जिवीत तसेच वित्तहानी टळली आहे.
नागरिकांनी कोथरूड पोलीस स्टेशनला माहिती दिली आणि कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. नगरसेविका अल्पनाताई वरपे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना घटनास्थळी त्वरित पाठविले. त्याबद्दल मोकाटेनगरमधील स्थानिक नागरिकांनी भाजप प्रभाग १० चे पदाधिकारी आणि अग्निशामक जवानांचे आभार व्यक्त केले.
यावेळी योगेश अर्जुन तांडेल, अमोल शिवाजी पवार, सुरज शंकर माने, रोशन कमलाकर हरड, या जवानांनी त्यांना मोलाची मदत केली. त्याबद्दल सदर कुटुंबीय व मोकाटे नगरच्या रहिवासी यांनी आभार मानले. मदतीप्रसंगी माजी स्विकृत नगरसेवक वैभव मुरकुटे, राहुल कातुरे, ललीत सावंत, प्रथमेश परकाळे यांनी सहकार्य केले.
महत्वाच्या बातम्या-
-‘गरज भासल्यास या सरकारविरोधात सत्याग्रह’; डॉ. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश उपोषण
-राज्यात ‘या’ दिवशी होणार सत्तास्थापन! महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला!
-एकनाथ शिंदे मन मोठं करून भाजपला मुख्यमंत्रिपद देतील; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
-निवडणूक झाली तरीही काँग्रेसमधला वाद काही संपेना! काँग्रेस भवनात नेत्यांमध्ये नवा वाद
-‘पुण्याचे पालकमंत्री अजितदादाच’; कोणाच्या गळ्यात पडणार पालकमंत्रिपद माळ?