पुणे : कोथरूड मतदारसंघात पतितपावन संघटनेचा स्नेह मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात पतितपावन संघटनेचे माजी प्रांत संघटक तथा महायुतीचे सन्मवयक संदीर खर्डेकर यांनी ‘हिंदुत्व रक्षणासाठी महायुती सरकार आवश्यक असून, पुण्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन खर्डेकर यांनी केले आहे. तसेच ‘कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांना विक्रमी मतांनी विजयी करणार’, असा निर्धार पतितपावन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर यांनी व्यक्त केला आहे.
‘लोकसभा निवडणुकीत आपण सर्व गाफील राहिल्याने आज एक महत्वाचा वक्फ सारखा कायदा मागे घेऊन संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठववा लागला. या निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक जागा फारच कमी मतांनी पराभूत व्हावे लागले. मविआ सरकारने अडीच वर्षे हिंदुंना प्रचंड त्रास दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणीही गाफील राहू नये, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी महायुतीचे सरकार आणावं लागेल”, अशी भावना यावेळी संदीप खर्डेकर म्हणाले आहेत.
‘पतितपावन संघटना नेहमीच हिंदुत्वाच्या रक्षणासाठी उभी राहिली आहे. त्यामुळे हिंदुत्वासाठी महायुतीला पाठिंबा देण्यासोबतच; कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करणार’, असे श्रीकांत शिळीमकर म्हणाले आहेत.
भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील, भाजप महायुतीचे कोथरूड समन्वयक सुशील मेंगडे, भाजपा नेते बाळासाहेब टेमकर, पतितपावन संघटनेचे महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, शहर पालक मनोज नायर, जालिंदर टेमगिरे, सुनील मराठे, ज्ञानेश्वर साठे, राहुल पडवळ, शरद देशमुख, विनोद बागल, अण्णा बांगर यांच्या सह पतितपावन संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी संघटनांकडून महत्वाचं पाऊल; पेट्रोलसह काय मिळणार मोफत?
-पुणेकरांच्या ‘त्या’ प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनीच काढला तोडगा
-पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर; शहरातील वाहतुकीत मोठे बदल, ‘हे’ असतील पर्यायी मार्ग