पुणे : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय गाठीभेटी, बैठका, सभा मेळाव्यांचे आयोजन होताना दिसत आहे. तसेच विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. अशातच पुण्यातील ८ विधानसभा मतदारसंघापैकी कोथरुड विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
शिवसेना फुटीनंतर कोथरुडमधील अनेक शिवसैनिक हे ठाकरेंच्या सेनेसोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. कोथरूडमध्ये ठाकरे सेनेच्या इच्छुकांची संख्या काही कमी नाही. यामध्ये महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि ठाकरे सेनेचे पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांचा समावेश आहे.
दरम्यान, थरकुडे, मोकाटे आणि सुतार या तिन्ही इच्छुकांनी वरिष्ठांकडे निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाकवली असून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आता प्रतिक्षा आहे ती मातोश्रीवरुन येणाऱ्या निर्णयाची. तिन्ही नेते उद्धव ठाकरेंच्या आदेशाची वाट पाहत असून येणारा निर्णय आम्हाला मान्य असल्याचे तिघांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मातोश्रीवर घेतला जाणारा निर्णय कोणत्या नेत्याला संधी देणारा असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-छत्रपती शिवाजी महाराजांचा २१ फुटी अश्वारूढ पुतळा; ‘शिवतांडव’चे सादरीकरण ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू
-शरद पवारांचा आणखी एक मास्टरस्ट्रोक; भाजपचा विद्यमान आमदार लागणार गळाला?
-पठारेंच्या हाती तुतारी मात्र उमेदवारीची वाट खडतर, वडगाव शेरीवर ठाकरेसेनेचा दावा कायम
-जेष्ठ नेताच फडकवणार बंडाचं निशाण?; पुण्यात भाजपमध्ये धूसफूस वाढली