पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर हळूहळू एकेका पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. भाजपने पहिल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये पुण्यातील कोथरुडमधून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोथरुडमधून निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे.
येत्या २४ ऑक्टोबर रोजी चंद्रकात पाटील हे कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. चंद्रकांत पाटील हे जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ‘माझे मायबाप कोथरुडकरांच्या आशीर्वादामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
चंद्रकांत पाटील हे गुरुवारी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोथरुड येथून जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरी: नवनियुक्त शहराध्यक्षाच्या वक्तव्याने मोठा ट्विस्ट; अण्णा बनसोडेंच्या उमेदवारीला विरोध?
-निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी; रोज रात्री मद्यपींवर होणार कारवाई, आयुक्तांचे आदेश
-चिंचवडमध्ये राजकीय घडामोडींना वेग; राहुल कलाटेंनी घेतली राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची भेट
-खेड-शिवापूरमध्ये ५ कोटींसह चौघे ताब्यात; शहाजीबापू पाटील अडचणीत, नेमकं काय कनेक्शन?