पुणे : विधानसभा निवडणुकीत प्रचाराला सुरवात झाली असून प्रचाराला रंग चढत आहे. तर दुसरीकडे अनेक मतदारसंघांमध्ये नाराजीनाट्य पहायला मिळत आहे. अशातच कोथरुडमधून विद्यमान आमदार चंद्रकात पाटील यांना पुन्हा एकदा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे. अशातच अमोल बालवडकर हे नाराज असून अपक्ष फॉर्म भरणार होते. मात्रष आता त्यांनी बंडाचं निशाण मागे घेत आपली तलवार म्यान केल्याचे पहायला मिळत आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमोल बालवडकर यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली अन् बालवडकरांची नाराजी दूर झाली आहे. चंद्रकांत पाटलांनी बालवडकरांची समजूत काढली. चंद्रकांत पाटलांना अमोल बालवडक यांची नाराजी दूर करण्यात यश आले आहे. बालवडकरांनी पाठिंबा जाहीर करुन चंद्रकांत पाटलांना पेढा देखील भरवला आहे.. आता बालवडकर हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. बालवडकर हे आता चंद्रकांत पाटलांना पाठिंबा देत या विधानसभेला प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.
‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ या तत्त्वावर भाजप निष्ठेने जनतेची सेवा करत आला आहे. मी या पक्षाचा एक भाग असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे जनतेची सेवा करणे हा उद्देश नेहमीच राहिला आहे आणि तो एक लोकप्रतिनिधी या नात्याने पूर्ण देखील केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोथरूडमधील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक लढवणार अशी इच्छा व्यक्त केली होती. सुरुवातीपासून भाजपच्या वतीने मला उमेदवारी मिळावी यासाठी मी आग्रही होतो.
भाजपच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांना संधी मिळाली, काही गोष्टींवरून आमचे मतभेद होते, मात्र आज ते मतभेद माझे नेते आणि राज्याचे भाजपचे सक्षम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दूर झाले आहेत. त्यामुळे आज कोथरूड विधानसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी मी मागे घेत असून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देत आहे’, असे अमोल बालवडकर म्हणाले आहेत.
आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा कोथरूड मध्ये भाजपाचा झेंडा फडकावण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि चंद्रकांतदादांच्या प्रचारार्थ मेहनत घेईल. विशेष म्हणजे या विधानसभेच्या सर्व प्रक्रियेत माझ्या सोबत असणारी जनता आणि कार्यकर्ते यांना विचारूनच मी हा निर्णय घेतला आहे. शेवटी जनतेच्या शब्दाबाहेर मी कधीच जाणार नाही आणि येणाऱ्या काळात जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटत राहील’, असं म्हणत अमोल बालवडकरांनी चंद्रकांत पाटलांनी पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, आता कोथरुडमध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे, मनसेचे किशोर शिंदे यांच्यात सामना रंगणार असून कोण हा मतदारसंघ काबीज करणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हेमंत रासनेंकडून ‘घर चलो अभियाना’ने प्रचाराला सुरवात; थेट घेतायेत जनतेच्या भेटीगाठी
-‘मॉर्निंग वॉक विथ आबा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद! तळजाई टेकडीवर आबा बागुल यांनी साधला मतदारांशी संवाद
-पाच हजार पुस्तके अन् लाखो वाचक! चंद्रकांत पाटलांच्या ‘फिरते वाचनालय’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद
-सकल ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा, समाजाच्या पाठिंब्याने वाढले बळ