पुणे : राज्याच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरवरुन मोठा वाद सुरु होता. महाराष्ट्राच्या युगपुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर फरार प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी काल तेलंगणामधून बेड्या ठोकल्या. कोरटकरला तेलंगणाहून कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याला आज कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. न्यायालयात सुनावणी सुरु झाल्यानंतर प्रशांत कोरटकर याला चांगलाच घाम फुटल्याचे पहायला मिळाले. प्रशांत कोरटकर हा संपूर्ण वेळ वकिलांच्या युक्तिवादाकडे बारकाईने लक्ष ठेवून होता.
प्रशांत कोरटकर याचे वकील सौरभ घाग आणि इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांच्यामध्ये युक्तीवाद झाला. यावेळी “दाखल गुन्ह्यातील कलम ७ वर्षाच्या आतील शिक्षेची आहेत. दाखल केलेल्या कलमानुसार अटक करण्याची गरज नव्हती. तरीही कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला अटक करण्याचा अट्टाहास केला. ही सगळी मीडिया ट्रायल सुरु आहे. कोरटकर यांना पोलिसांनी कधीच व्हाईस सॅम्पल द्यायला बोलावलं नाही”, असे कोरटकरचे वकील घाग म्हणाले.
आरोपीला सहकार्य करणाऱ्यांची चौकशी व्हावी. आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी. इंद्रजीत सावंत यांना कोल्हापुरातलेच नाही तर महाराष्ट्रातले सगळेजण ओळखतात. ते अत्यंत संयमित पद्धतीने इतिहास सांगण्याचं काम करतात. त्यामुळे त्यांनी मुद्दामून तो व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लीप मी व्हायरल करणं हे शक्य नाही. ते व्यथीत झालेले होते की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना काही बोलले जाते, त्यांच्या आईबद्दल म्हणजे जिजाऊ बाईसाहेबांविषयी त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका घेणारे लोकसुद्धा धडधडीतपणे ते बोलतात आणि त्यांना काहीच होत नाही. स्वातंत्र्याचा गैरवापर करतात, त्यांचे चेहरे समोर आले पाहिजे, असे असीम सरोदे म्हणाले आहेत.
आरोपी कोरटकरने मोबाईलमधील डेटा डिलिट केला. त्याने असे का केले? याचा तपास व्हावा. आरोपीच्या आवाजाचे सॅम्पल्स घ्यायचे आहेत. आरोपी एक महिन्याने पकडला गेला. या काळात त्याला कोणी मदत केली, याचा तपास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोपीकडे चौकशी करावी लागेल. पळून जाण्यासाठी कोणत्या वाहनाचा वापर केला त्याचा मालक कोण आहे याचा ही शोध घ्यावा लागणार आहे, अशी मागणी असीम सरोदे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-संतापजनक! चौथीत शिकत असणाऱ्या चिमुरडीला खाऊ देतो म्हणत बोलवून घेतलं अन्…
-Big News : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणामधून अटक!
-स्वारगेट अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट; एसटी महामंडळानं ‘त्या’ ७ बड्या अधिकाऱ्यांची केली बदली
-पुरुषांचेच व्हिडीओ करत होता शूट; मोबाईल चेक केल्यानंतर धक्कादायक सत्य आलं समोर