पुणे : अलिकडील काळात गाड्यांच्या नंबर प्लेटला आकर्षक करण्यासाठी नंबरची विविध आकर्षक डिझाईन केली जाते. प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेमधील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्विकारण्याची आणि लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरु ठेवण्यात आली आहे.
नव्याने सुरू होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक किंवा पसंतीचे वाहन क्रमांक चार चाकी वाहनांसाठी हवे असल्यास वाहन मालकांकडून ३ पटीने शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच १५ मे रोजी सकाळी १०: ३० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत विहीत नमुन्यात अर्ज करावा लागणार आहे.
आरटीओकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष १६ मे रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी चार वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.
अर्ज कार्यालयाच्या खासगी वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘आर.टी.ओ.,पुणे’ यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेचा पुणे येथील असावा, असे आरटीओने नमूद केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मतदानापूर्वी पोलीस ठाण्यात राडा; रवींद्र धंगेकरांसह ३० ते ३५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
-जादूटोण्याच्या नावाखाली महिलेला १५ लाखांचा गंडा; गुंगीचे औषध पाजत मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो
-एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, मावळात एकूण मतदान किती? फायनल आकडा आला
-आधी मतदानाचे कर्तव्य पार पाडले अन् मगच प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल