पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे कसबा गणपती मंदिर आहे. या मंदिराबाहेर लावण्यात आलेल्या बोर्डने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कसबा पेठमधील गणपती मंदिरात जाण्यासाठी आता सर्व भाविकांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. यापूर्वी पुण्यात एखाद्या मंदिराबाहेर अशा स्वरूपाचा फलक लावल्याचे ऐकण्यात आले नाही.
कसबा पेठ मंदिरात लावलेल्या या फलकाने मात्र वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर आता कसबा गणपती मंदिरात जाणार असाल तर तुमचा पेहराव पाहूनच मंदिरात जाण्याचा विचार करा. कदाचित तुम्हाला तुमच्या कपड्यांमुळे मंदिरात जाण्यास मनाई करण्यात येऊ शकते.
महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्यावतीने लावण्यात आलेल्या त्या बोर्डवर तुम्ही मंदिरात जाणार असाल तर काय परिधान करू नये याची नियमावली सांगण्यात आली आहे. याबाबत मंदिराचे विश्वस्त यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हला हा बोर्ड कुणी लावला याविषयी काहीही माहिती नाही. आम्ही सर्व विश्वस्त मंडळ याचा तपास करत आहोत, असेही म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ड्रग्ज प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक; ४५ कोटी रुपयांचे एमडी जप्त
-मुख्यमंत्र्यांसह फडणवीस अन् अजितदादा स्टेजवर, शरद पवार बोलायला उठताच बारामतीकरांचा जल्लोष
-सुप्रिया सुळे, शरद पवार मंचावर असताना मुख्यमंत्री म्हणाले, “आमचं सरकार राजकारण विरहित”
-“तरुणांना रोजगाराची गरज, राजकारण सोडून एकत्र यावं”; ‘नमो महारोजगार मेळव्या’त शरद पवारांचं वक्तव्य
-शिरुर लोकसभेत आयात केलेल्यांना उमेदवारी देणार असाल तर….; विलास लांडेंचा अजितदादांना इशारा