पुणे : काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये २८ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने शोध मोहीम आधीक तीव्र केली आहे. एनआयएने जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने हल्ल्याचा आणि हल्लेखोरांचा कसून तपास सुरू केला आहे. पहलगाम हल्ल्यात दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरी यांची नावेही समोर आली आहेत.
पोलिस आसिफ आणि आदिलच्या घरी शोध मोहीम राबवण्यासाठी गेले होते. यादरम्यान पोलिसांना संशयास्पद वाटले त्यानंतर लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर, ज्याला आदिल गुरी म्हणूनही ओळखले जाते, त्याचे घर पाडण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनागच्या बिजबेहरा ब्लॉकमधील गुरी गावातील रहिवासी आदिल गुरी हा पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याचे मानले जाते.
या हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात बहुतेक पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्याला आता मोस्ट वॉन्टेड घोषित केले आहे. तसेच अनंतनाग पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी कोणतीही माहितीसाठी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या प्रकरणात दोन पाकिस्तानी नागरिकांना मोस्ट वॉन्टेड घोषित करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
-बारामतीचं शिष्टमंडळ अडकलं काश्मीरमध्ये; अजितदादांचा केंद्रीय मंत्री मोहोळांना फोन
-“माझ्या नवऱ्याचा चेहराही पाहता आला नाही”; शरद पवारांसमोर संतोष जगदाळेंच्या पत्नीचा टाहो
-शरद पवारांनी ठाकरेंना लिहिलेले ‘ते’ पत्र आयोगासमोर यायला पाहिजे; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले
-पुणे महापालिकेत सरकारी नोकरीची संधी; कशी आहे अर्ज प्रक्रिया