Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढत आहे. कंगना रणौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असते. कंगना रणौतने एका मुलाखतीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि बॉलिवूडच्या कनेक्शनवर भाष्य केले आहे. कंगनाने केलेल्या या दाव्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. तसेच कंगनाच्या धक्कादायक दाव्यानंतर राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटू लागले आहेत.
कंगना रणौतने नेमका काय दावा केला?
बॉलिवूडमध्ये नवीन अभिनेत्री आली की आधी तिला दाऊदला सलाम करावा लागत होता. ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही. मी ८०च्या दशकात जन्मले आहे. या काळातील सगळ्या अभिनेते, अभिनेत्रींचे दाऊदसोबत फोटो आहेत हे आजही पहायला मिळते. डॉनला एखादी मुलगी आवडली तर तिला तो घेऊन जातो. कुठल्या कुठल्या अभिनेत्रींसह हे घडलं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मोनिका बेदी असेल किंवा इतर मी सगळी नावे घेणार नाही पण हे सगळ्यांनाच माहिती आहे, असे म्हणत कंगना रणौतने धक्कादायक दावा केला आहे.
माझ्या आई वडिलांसमोर हे सगळं चित्र होतं. या सगळ्या गोष्टींमध्ये बदल झाला आहे. हा बदल २०१४ पासून झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खूप प्रभाव पडतो. कारण ते अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. लोक त्यांची पूजा करतात. लोक त्यांना देव समजतात कारण त्यांना तसं वाटलं तर आतिशोयोक्ती होणार नाही”, असंही कंगना म्हणाली आहे.
‘बॉलिवूडमध्ये आल्यानंतर मी एकाही ‘खान’ आडनाव असलेल्या व्यक्तीबरोबर काम केले नाही. मी आयटम साँग्स कधीच केले नाहीत. कारण माझ्या मनाला ते पटलं नाही. भाजपा याच पक्षाची निवड केली कारण मला या पक्षाची विचारधारा पडते. २०१९ मध्येही मला विचारणा झाली होती. मात्र तेव्हा मी लढण्याचा निर्णय घेतला नाही” असेही कंगनाने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Health Update | सतत तोंड येण्याने त्रस्त आहात? मग करा घरगुती ‘हे’ गुणकारी उपाय
-पुणे अपघात प्रकरणावर धंगेकर म्हणाले, ‘फडणवीसांनी अजित पवारांचे हात पाय बांधून…’
-अखेर दहावीच्या निकालाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार जाहीर
-पुणे हिट अँड रन प्रकरणावर बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, ‘जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती..’