पुणे : पुणे शहरामधील सर्वात अधिक चर्चेत असणारे कल्याणीनगरमधील हिट अँड रन प्रकरणाबाबत ( १९ मे रोजी झालेला अपघात) आणखी एक महत्वाची माहिती आता समोर आली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या अल्पवयीन आरोपी मुलाविरोधात सध्या न्यायालयामध्ये खटला सुरु आहे. अशातच आता त्याच्या विरोधात सुरु असलेला खटला हा त्याला अल्पवयीन नाही तर सुज्ञान समजून चालवावास असा मागणी अर्ज पोलिसांनी बाल न्याय मंडळात दाखल केला आहे.
अल्पवयीन आरोपीला सज्ञान ठरवून खटला चालवायचा असेल तर पोलिसांनी मुलाला बाल न्याय मंडळात हजर केल्यापासून ३० दिवसांत तपास अहवाल (आरोपपत्र) दाखल करणे बंधनकारक आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांनी वेळेत अहवाल सादर न केल्याने मुलाला जामीन मंजूर झाला आहे.
आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये बदल केल्याप्रकरणी त्याचे वडिल विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल आणि ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर तसेच काही साथीदारही येरवडा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच ज्या कारने अपघात झाला ती जप्त केलेली पोर्शे कार आणि मुलाचे पारपत्र परत मिळावे, म्हणून अग्रवाल कुटुंबाने न्यायालयात अर्ज केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘सरकारने आमच्या दैवताचा अपमान करू नये’; सुप्रिया सुळेंचे बारामतीत आंदोलन
-पत्नीचे विवाहबाह्य संबंध; पत्नी अन् प्रियकराने दिली धमकी, पतीने घेतला गळफास
-विधानसभेसाठी पुण्यात शरद पवारांची खेळी! मागवले आठही मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज
-बारामती विधानसभेची उमेदवारी युगेंद्र पवार यांना देणार का? सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
-पुणे पोलीस दलात मोठी खळबळ; IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?