पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत आपल्या अलिशान कारने दोघांना चिरडले. या अपघातामध्ये एक तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची राज्य स्तरावर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी अनेक विविध धक्कादायक खुलासे झाले. या प्रकरणाचे समाज माध्यमावर देखील चांगलेच पडसाद उमटले आहेत. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी महत्वाची पाऊले उचलली आहेत.
पुणे शहरात झालेल्या अपघातानंतर पुणे वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक पोलिसांनी मुंढवा, कोरोगाव पार्क, येरवडा, विमाननगर तसेच शहरातील विविध भागात नाकाबंदी करुन ८५ मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाई केली आहे. रात्री उशिरा किंव मध्यरात्री शहरात होणारे अपघात तसेच मद्यपी वाहनचालकांविरोधार कारवाई करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून अचानक नाकाबंदी करण्यात येणार आहे.
कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुणासह त्याच्या मैत्रीणीला धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अल्पवयीन मोटारचालक मुलगा मित्रांसोबत पार्टी करून कल्याणीनगर भागातून निघाला होता. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मध्यरात्री वाहतुकीचे नियम धुडकावून भरधाव वेगाने वाहन चालविणारे, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. वाहतूक पोलीस, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री बारानंतर पहाटेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी केली.
महत्वाच्या बातम्या-
-बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी वकिलांचा नवा कांगावा; युक्तीवादात म्हणाले, ‘गाडी बिघडलेली…’
-राज्यात लोकसभेचे मतदान होताच अजित पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक; नेमकं कारण काय?
‘…म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं गेलं’; राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा गौप्यस्फोट