पुणे : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने काही दिवसांपूर्वी विवस्त्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप केला होता. या महिलेने केलेल्या आरोपामुळे विधानसभेतही हे प्रकरण चांगलेच गाजले होते. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत भाजपवर निशाणा साधला. संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं. मात्र आता या प्रकरणी धक्कादायक अपडेट समोर आली आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटी रुपयांची खंडणी स्विकारताना अटक करण्यात आली आहे. . सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. खंडणीच्या रकमेतील १ कोटी रुपये स्विकारताना संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेला न्यायालयात आज हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जयकुमार गोरे यांनी २०१६ पासून फक्त सरसेनापती हंबिरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्याने त्रास दिल्याचा आरोप महिलेने केला होता. तर त्रास देण्यासाठी गोरे यांनी त्यांचे नग्न फोटो व्हॉट्स अॅपवर पाठवले, असाही दावा संबंधित महिलेने केला होता. होणाऱ्या या त्रासाला कंटाळून सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद झाला आहे. पण अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांचा अटकपर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक झाली होती. त्यानंतर गोरे यांना १० दिवसांसाठी जेलमध्येही जावं लागल्याचंही महिलेने एका पत्रात सांगितले होते. त्यानंतर आता खंडणी प्रकरणी या महिलेला अटक झाल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले होते.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट प्रकरणी पीडितेचा आवाज बसबाहेर गेला?; शिवशाहीची शास्त्रोक्त पडताळणी, काय माहिती मिळाली?
-धक्कादायक! बसला लागलेली आग अपघात नव्हे तर नियोजित कट; कोणी घडवून आणला हा प्रकार?
-बारामती नगरपरिषदेतील ‘त्या’ अधिकाऱ्याला रंगे हात पकडलं; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
-वकिलही निघाला दत्ता गाडेप्रमाणे भामटा; दारु ढोसून पडला मात्र बनाव अपहरणाचा, नेमकं काय घडलं?