पुणे : राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरु आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जनसन्मान यात्रा सुरु केली तर प्रत्येकापर्यंत पोहचत संवाद साधण्याच्या उद्देशाने शरद पवार गटाने देखील शिवस्वराज्य यात्रेला आजपासून सुरवात केली आहे. याच यात्रेला ”शिवस्वराज्य यात्रे’त दुर्घटना घडता-घडता राहिली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी शरद पवार गटाचे काही नेते क्रेनमधून खाली पडता पडता थोडक्यात बचावल्याचे आहेत.
नेमकं काय घडलं?
किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार घालून खाली येत असताना क्रेनची ट्रॉलीमध्ये बिघाड झाला. या क्रेनच्या ट्रॉलीमध्ये जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख हे होते. हे पडता पडता थोडक्यात बचावले असून सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.
याच शिवस्वरज्य यात्रेची सुरवात शिवनेरी किल्ल्यावरुन झाली आहे. या यात्रेमध्ये आज राज्यात पुन्हा रयतेचे राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढणार असून महायुतीचे काळे कारनामे जनतेपुढे उघड केले जातील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पूजा लांडगेंकडून ‘श्रावणसरी अन् मंगळागौरी’चे आयोजन; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद