Jaya Kishori : प्रसिद्ध कथावाचक जया किशोरी या आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना जया किशोरी यांनी रावण हा बलात्कारी होता, असे जया किशोरी म्हणाल्या आहेत. जया किशोरी यांच्या वक्तव्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत.
नेमकं काय म्हणाल्या जया किशोरी?
“अनेक लोक असं म्हणतात की मला रामासारखं नाही तर रावणासारखं बनायचं आहे. कारण रामाने त्याच्या पत्नीचा म्हणजेच सीतेचा त्याग केला. तर रावणाने मात्र बहिणीचा जो अपमान झाला त्याचा बदला घेतला. रावण त्या अपमानाचा बदला घेता यावा म्हणून रामाशी युद्धही केलं. एवढंच नाही तर रावणाने कधीही परस्त्रीला हातही लावला नाही. त्यांना मी हे सांगेन की तुमचं वाचन वाढवा”, असे जया किशोरी म्हणाल्या आहेत.
“सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रावण हा एक रेपिस्ट होता. रावण कुबेराच्या घरासमोरुन जात होता. त्यावेळी त्याने रंभा नावाच्या अप्सरेला पाहिलं. रावण तिचं सौंदर्य पाहून मोहीत झाला आणि त्याने तू माझ्याबरोबर लंकेला चल असं त्याने रंभेला सांगितलं. रंभेने रावणाला सांगितलं की मी तुझ्या भावाची म्हणजेच कुबेराची सून आहे, त्यामुळे तुझीही सूनच आहे. मात्र रावणाने तिचं ऐकलं नाही तिच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर ती अप्सरा ब्रह्मदेवाकडे गेली तिने तिची व्यथा सांगितली. यानंतर ब्रह्मदेवाने रावणाला शाप दिला की यापुढे तू कुठल्याही स्त्रीला तिच्या इच्छेशिवाय स्पर्श केलास तर तुझ्या शरीराची १०० शकले होतील. त्यामुळे रावण स्त्रियांना स्पर्श करत नव्हता. सीतामातेला त्याने नाईलाजाने स्पर्श केला नाही”, अशी कथाही जया किशोरी यांनी पॉडकास्टमध्ये सांगितली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रात्री बाराचा ठोका अन् गुन्हेगारांनी केलं पोलिसांचं बर्थ-डे सेलिब्रेशन; बीडलाही टाकलं मागं
-पुण्यात आढळला मानवी हाडांचा सांगाडा, मोबाईल अन् आधारकार्डही; पुढे काय घडलं?
-गोरे म्हणाले ‘त्या प्रकरणी माझी निर्दोष मुक्तता’, पीडित महिला म्हणाली, ‘ही केस…’
-स्वारगेट अत्याचार प्रकरण: नराधम दत्ता गाडेच्या चौकशीत धक्कादायक फोटो आले समोर
-धक्कादायक! एक दिवसाच्या बाळाचा मृतदेह कब्रस्तानातून गायब; पुण्यात नेमकं काय घडलं?