पुणे : राज्यात या वर्षी दुष्काळाची भीषण परिस्थिती ओढवली होती. बारामती मतदारसंघातील दुष्काळग्रस्त गावांसाठी जानाई-शिरसाई योजना सुधारित करुन बंदिस्त पाईपलाईन करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ‘सध्या सुरु असलेली जनाई- शिरसाई योजना सुधारित करुन बंदीस्त पाईपलाईनने केल्यास मोठ्या प्रमाणात पाणीबचत होऊन अधिक क्षेत्राला लाभ होणार आहे. या योजनांसाठी पाटबंधारे विभागाने सुमारे ४५० कोटी रुपये रुपयांची मागणी शासनाकडे सादर करावी’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
‘शिरसाई योजना अस्तित्वातील बंदीस्त पाईपलाईनच्या पुढे संपूर्ण बंदीस्त पाईपलाईनद्वारे करण्यासाठी एकूण १६० कोटींचा तर जनाई योजनेसाठी सुमारे २९० कोटींचा खर्च अपेक्षीत आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. योजनेत समाविष्ट तलाव भरण्यासह निश्चित ठिकाणी वॉल्वद्वारे आऊटलेट काढून दिल्यास शेतकऱ्यांना आपल्या शेतीपर्यंत पीव्हीसी पाईपने पाणी घेऊन जाणे शक्य होणार आहे. योजनेचा आराखडा तात्काळ करुन पुढील प्रक्रिया राबवावी’, असे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
जनाई-शिरसाई योजनेच्या बंदीस्त पाईपलाईनच्या सुधारणेमुळे आता शेतकऱ्यांना अधिक पाणी, अधिक उत्पादन घेता येणार आहे. या योजनेकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ४५० कोटींची निधी देणार असल्याचे आज पुणे येथे आयोजित एका बैठकीत सांगितले. #पाणीबचत #शेतीविकास pic.twitter.com/AMiAI2QkBD
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 14, 2024
राज्यातील सर्व पाटबंधारे उपसा सिंचन योजना सौरवीज संचालित करण्यासाठी ८०० कोटी रुपये मंजूर केले असून पुरंदर आणि जनाई- शिरसाई योजनांसाठी यात 84 मेगावॉट क्षमतेचे सोलर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे या योजनांचा वीजदेयकाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार असून शेतकऱ्यांना कमी पैशात शेतीचे पाणी मिळणार आहे, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये! पुण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मोहोळ दिल्ली दरबारी सक्रीय
-पब, बार, रेस्टॉरंटनंतर पीएमआरडीएची आता अनधिकृत होर्डिंगवर कारवाई
-Sushant Singh Rajput : सुशांतच्या आठवणीत अंकिता पुन्हा भावूक, खास दिवशी शेअर केला फोटो…
-Pune Hit & Run: न्यायालयातून महत्त्वाची अपडेट आली समोर, आज नेमकं काय घडलं?
-कांद्याने महायुतीला रडवले! अजित पवारांनी थेटच सांगितलं कुठे गणित चुकलं