पुणे : बिग बॉस मराठी सिझन ५चा विजेता सुरज चव्हाण आज ट्रॉफी घेऊन आपल्या घराच्या दिशेने निघाला आहे. आज घरी जाताना त्याने जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाचा जेजुरी गडावर जाऊन महादेवाचा अभिषेक केला. सुरज हा बिग बॉसच्या घरात असताना नेहमी खंडेराया, त्याच्या गावातील मोढवे गावातील मरिमाता देवी आणि महादेवाचे नाव घेत होता.
सुरजने बिग बॉसच्या घरात असताना बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर तो पहिल्यांदा जेजुरीगडावर घेऊन जाणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसारच त्याने ही टॉफी आधी खंडेरायाच्या मंदिरात नेली. खंडेरायाचे दर्शन घेतले, गडावरील महादेवाचा अभिषेक, पूजा केली. मनोभावे दर्शन घेतलं. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा उदो उदो करत त्याने खंडेरायाचं दर्शन घेतले आणि पुढे त्याने श्री क्षेत्र मोरगावमध्ये असणाऱ्या अष्टविनायकामधील पहिला गणपती असलेल्या मयुरेश्वर मंदिरात जाऊनही दर्शन घेतले आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या निर्मात्यांकडून सुरजला १४ लाख रूपये बक्षिस म्हणून मिळाले आहेत. विजयी झालेल्या सूरजवर अवघ्या महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. जिंकल्यानंतर त्याने आज अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचं तसेच मोरगावच्या गणपतीचे दर्शन घेऊन आपल्या गावच्या मरिमातेच्या दर्शनासाठी निघाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कार्यकर्त्यांनी केली उमेदवारीची मागणी; अजितदादा म्हणाले, ‘इथं मी मंत्री असून…’
-अंधारेंनी हडपसरमध्ये उमेदवार जाहीर केला, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘सुषमाताई…’
-‘त्या’ बेकायदा गाळ्यांवर पालिकेची मोठी कारवाई; बेकायदा गाळे उभारण्यामागे कोणाचा हात?
-‘आमचा पदर-बिदर सगळं फाटून गेलंय’; अजित पवार असे का म्हणाले?