पुणे : लोकसभा निवडणूक तोंडावर आली आसताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसाठी महत्वाचा असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अर्थातच पवार कुटुंबामध्ये अद्यापही एकी नाही झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय कुटुंबात कोणालाही पटला नसल्याने पवार कुटुंबातील कोणीही अजित पवारांचा प्रचार करणार नसल्याचं बोललं जात आहे. त्यातच काल बुधवारी अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र श्रीनिवास पवार यांनी शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली आणि शरद पवारांना समर्थन दिलं आहे. त्यावरुनही बारामतीच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार यांचे सुपूत्र जय पवारही प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. बारामतीमधील बदलती समीकरणं लक्षात घेता आगामी काळात पवार कुटुंबातील लोक अजित पवारांचा प्रचार करतील की नाही माहिती नाही? याबाबत अजित पवारांनी शंका उपस्थित होती. या शंकेवर जय पवार यांनी प्रतक्रिया दिली आहे.
“आजपासून प्रचाराचा दौरा सुरू झाला आहे. संपूर्ण बारामती फिरणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या लोकांना भेटायला आलो आहे. परिवारात प्रत्येकजण त्यांच्या पसंतीनुसार प्रचार करणार. दादांनी भाषणात सांगितलं की परिवारातील लोक त्यांचा प्रचार करणार नाही. त्यामुळे आपण इतरांना काही बोलू शकत नाही. आपण त्यांना संधी दिली पाहिजे. कारण आम्हालाही आमचा प्रचार आहे”, असे जय पवार म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे. विविध पक्षांकडून मोर्चेबांधणी, संघटन बांधणी, कार्यकर्ता मेळावा घेणे सुरू आहे. तळागाळापर्यंत पोहोचता यावं याकरता संघटना मजबूत केल्या जात आहेत.
दरम्यान, बारामती लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना पहायला मिळणार आहे. त्यामुळे बारामतीच्या नागरिकांनामध्ये संभ्रम आहे. नागरिक कोणाला आपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“बैलगाडा शर्यतीचं काम मी केलं अन् क्रेडीट मात्र…, तिकिटासाठी मी पक्ष बदलत फिरत नाही”
-म्हाडाचे अध्यक्षपद पण लोकसभा उमेदवारीतून आढळरावांचा पत्ता कट???; म्हणाले….
-पब ड्रग्ज मिळण्याचे अड्डे, सरकार या संस्कृतीला पाठिंबा देतंय; रविंद्र धंगेकर आक्रमक
-राजकारणात नवा ट्विस्ट: पवार घराण्यातील आणखी एका वारसदाराची राजकारणात एन्ट्री! शहरात बॅनरची चर्चा