पुणे : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला रंगत चढली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात असून, त्यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार आणि जय पावर हे दोन्ही पुत्र रिंगणात उतरले आहे. जय पवार हे भोरमध्ये तर पार्थ पवार हे खडकवासला मतदारसंघातील प्रचारात व्यस्त आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या लढत होत आहे.
जय पवार हे भोर तालुक्यातील गावांच्या दौऱ्यावर सोमवारी होते. यावेळी जय पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. ‘बारामतीमध्ये घडलेल्या एका घटनेचा दाखला देताना सुप्रिया सुळे यांना मीडियाचा गैरवापर कसा करायचा, हे चांगलं माहिती आहे’, असा टोला जय यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला होता. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“मी मंदिरात प्रार्थना करताना त्यांनी, ‘काय जय कसं चाललंय? मला वाटलं, त्या मला म्हणाल्या. म्हणून मी डोळे उघडून त्यांना बोललो, ‘आता सगळं बर आहे. मग त्या मला म्हणल्या, मी तुला नाही मी दुसऱ्या जयशी बोलत होते, असा खुलासा जय पवार यांनी केला होता. त्यांनी ते सर्व व्हिडिओ पत्रकारांना दिले आणि सुप्रिया सुळे यांनी जय पवारची विचारपूस केली, अशी खोटी बातमी त्यांना करायला लावली. हे खोटं बोलून त्यांना काय मिळतंय?”, असं जय पवार म्हणाले. यावर सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं आहे.
“जय हा माझ्यापेक्षा खूप लहान आहे. माझ्या मुलासारखा आहे. त्यामुळे मुलं जेव्हा काही बोलतात, तेव्हा मी माझ्या घरातल्या लहान मुलांबद्दल कधीच काही बोलणार नाही. आमच्या मुलांना अशा प्रकारची सुरक्षा दिली नाही. ठीक आहे. मुलांवर प्रेम करणं, काही चुकीचं नाही. लोकशाहीमध्ये इतका तर हक्क बनतोच”, असं सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘आढळराव पाटलांना प्रत्येक ग्रामस्थाचं मत म्हणजे मंचरच्या विकासाला मत’ मंचरच्या बैठकीत सूर
-‘माझ्या भावाच्या पराभवाचा बदला मी घेणारच’; रोहित पवारांनी उचलला बारणेंच्या पराभवाचा विडा
-पुण्यातील मुकुंदनगर येथील केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग