पुणे : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि राज्यात इच्छुकांची उमेदवारासाठी वरिष्ठांच्या भेटीची लगबग सुरु झाली. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पुण्यात आले असता भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी त्यांची भेट घेतल्याचे पहायला मिळाले. जगदीश मुळीक वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
वडगाव शेरी या मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे असून हा हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे आहे. मात्र, ही जागा भाजपकडे घेण्यासाठी जगदीश मुळीक शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. हा मतदारसंघ भाजपला सोडावा अशी मागणी करत मतदारसंघात तशी कामे देखील जगदीश मुळीक करताना दिसत आहेत. त्यातच आज त्यांनी बावनकुळेंची भेट घेतल्याने वडगावशेरीची जागा भाजपकडे घेण्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
’90 टक्के जागेवर एकमत झालं आहे, बाकी लवकरच होईल आहे. दिल्लीला जाहीरनाम्यासाठी जात आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे जनतेसाठी काम करणार आहेत. केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन चांगले काम करेल. महाविकास आघाडी राज्याचा बट्ट्याभोळ करेल’, असा टोला यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कसब्याचा फैसला बावनकुळेंनी एका शब्दात संपवला; ‘उमेदवार जातीवर नाही तर त्याच्या कर्तृत्वावर…’
-अजितदादांच्या राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरूच; आधी ६०० अन् आता किती पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे?
-‘अजितदादा मिटकरींना आवर घाला अन्यथा…’; भाजपच्या इशाऱ्याने बारामतीत दादांची डोकेदुखी वाढली
-तिसऱ्या आघाडीचं १५० जागांबाबत ठरलं! शिंदे-फडणवीस अन् ठाकरे-पवारांसोबत भिडणार
-“मला विधिमंडळात जायचंय महामंडळात नाही”, श्रीनाथ भिमालेंचा पर्वतीत लढण्याचा निर्धार कायम