पुणे : गेल्या काही आठवड्यात पुण्यात तापमानाचा पारा खालावला होता. १३-१४ अंश सेल्सियस तापमानामुळे शहरासह जिल्ह्यातही प्रचंड थंडी जाणवत होती. गेल्या काही दिवसांपासून थंडी कमी झाली अन् पुन्हा गर्मी जाणवत आहे. मात्र आता येत्या ५ दिवसांत पुणेकरांना पुन्हा हुडहुडी भरणार आहे.
भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी X माध्यमावर याविषयी पोस्ट केली आहे. पुण्यात तापमानात येत्या पाच दिवसात कसे हवामान असणार याचा अंदाज वर्तवलाय. आज पुण्यात १३ ते १४ अंश तापमानाची नोंद केली जाण्याचा अंदाज आहे. तर येत्या काही दिवसात तापमान ११ अंशांवर जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे.
7 Days Forecast for Pune City and Neighborhood@Hosalikar_KS pic.twitter.com/GzTsGnslRS
— Climate Research & Services, IMD Pune (@ClimateImd) December 8, 2024
नोव्हेंबर महिन्यात लोणावळा, महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणांपेक्षाही पुण्यात थंडीचा तडाखा प्रचंड होता. राज्यातही येत्या ५ दिवसात तापमानात मोठे बदल होणार असल्याचे हवामान विभागाने नोंदवले आहे. अशातच आता पुणेकरांना येत्या काही दिवसांत पुन्हा हुडहुडी भरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसवा, चंद्रकांत पाटलांच्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना
-‘पिंपरी-चिंचवडला मंत्रिपद हवंच’; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
-पुण्याचा पालकमंत्री कोण? चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘आपल्या सगळ्याच इच्छा पुर्ण होत नाहीत’
-‘लाडकी बहीण योजनेचे २१०० नाही तर ३ हजार रुपये द्या’; सुप्रिया सुळेंची मागणी
-पुणे महापालिकेने नागरिकांच्या दारात वाजविला बँड; ४ दिवसात कोट्यावधींची वसूली