पुणे : राज्यात प्रचंड कडाक्याचा उन्हाळा आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तारा वाढतच आहे. या उष्णतेमुळे अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या उन्हाळ्यात मानवी शरीरावर हानीकारक परिणाम झालेले दिसून येत आहेत. तसेच माणसांसह शेती, इलेक्ट्रनिक वस्तूंवरही या उन्हाचा प्रचंड परिणाम झालेला दिसून येत आहे.
सध्याच्या काळात स्मार्ट फोनचा वापर वाढला आहे. जवळपास प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्ट फोन दिसतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे तुमचा फोन गरम होत असतो. मोबाईलचा उष्मतेमुळे अनेक अचडणी येतात. जसे की, मोबाईल जास्त गरम झाल्यात एक नोटिफिकेशन येते त्यामध्ये मोबाईल गरम झाला आहे. त्यामुळे तुमचा फोन स्लो चालणार आहे, असे नोटिफिकेशन मिळते.
मोबाईल जास्त गरम झाला तर मोबाईल स्लो चालतो परिणामी मोबाईलची बॅटरीही लवकर खराब होते. मोबाईल प्रचंड गरम झाला तर मोबाईल पेटही घेऊ शकतो. अशा वेळी आपला फोन जास्त तापू नये आणि मोबाईल थंड राहण्यासाठी आपला मोबाईल खिशात ठेवू नये. यामुळे आपल्या शरिरातील गर्मीमुळे मोबाईल अधिकच गरम होतो. त्यामुळे मोबाईल हा शक्यतो आपल्या शरिरापासून दूर बॅगेत किंवा इतर ठिकाणी ठेवावा.
मोबाईलचा वापर कमी केल्याने देखील मोबाईल जास्त गरम होणार नाही. त्यामुळे मोबाईलला थोडा वेळ विश्रांती देणेही गरजेचे असते. वारंवार मोबाईल गरम होत असेल तर मोबाईलमध्ये एकाच वेळी अनेक अॅप वापरणे, फोन कॉल करणे, गेम्स खेळणे टाळावे. उन्हापासून लांब ठेवा.
महत्वाच्या बातम्या-
-Voting Day | मतदानाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील बाजार बंद; पहा काय काय मिळणार?
-श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वाचा महत्वाचे उपदेश; जीवनात येणार नाहीत समस्या
-बापाचं पहिल्यांदा लेकीला मतदान; पक्षफुटीनंतर शरद पवार पुन्हा बारामतीतून मतदान करणार