पुणे : राज्य पोलीस दलातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश सोमवारी गृहविभागाकडून जारी करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील ३ सहाय्यक निरीक्षत ९ पोलीस निरीक्षक आणि ९ उपनिरीक्षकांच्या बदल्या अंतर्गत करण्यात आल्या आहेत. याबाबत बुधवारी आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील काही अधिकारी आले आहेत.
सोमवारी गृहविभागाने २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या केल्या. या अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले होते. आता त्यांची पोलीस ठाणे, गुन्हे शाखांमध्ये बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना त्यांच्या नवीन नियुक्त केलेल्या ठिकाणी तातडीने रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.
सहायक निरीक्षकांच्या बदल्या कोठून कोठे झाल्या
- छाया गुजर (नियंत्रण कक्ष – भोसरी पोलीस ठाणे)
- प्रवीण स्वामी (नियंत्रण कक्ष – गुन्हे शाखा)
- राकेश भामरे (नियंत्रण कक्ष – दिघी पोलीस ठाणे)
पोलीस निरीक्षकांच्या बदल्या कोठून कोठे झाल्या
- नितीन फटांगरे (देहूरोड पोलीस ठाणे – भोसरी पोलीस ठाणे)
- भीमा नरके (चाकण पोलीस ठाणे – आळंदी पोलीस ठाणे)
- महेश बनसोडे (नियंत्रण कक्ष – सांगवी पोलीस ठाणे)
- गणेश जामदार (नियंत्रण कक्ष – भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे)
- प्रवीण कांबळे (नियंत्रण कक्ष – विशेष शाखा)
- विजयकुमार वाकसे (नियंत्रण कक्ष – गुन्हे शाखा)
- संदीप पाटील (नियंत्रण कक्ष – चाकण पोलीस ठाणे)
- धनंजय कापरे (नियंत्रण कक्ष – पिंपरी पोलीस ठाणे)
- भारत शिंदे (नियंत्रण कक्ष – भोसरी पोलीस ठाणे)
पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या कोठून कोठे झाल्या
- मीरा त्र्यंबके (नियंत्रण कक्ष – विशेष शाखा)
- अश्विनी तळे (नियंत्रण कक्ष – चिखली पोलीस ठाणे)
- चक्रधर ताकभाते (नियंत्रण कक्ष – सांगीव पोलीस ठाणे)
- समाधान मचाले (नियंत्रण कक्ष – निगडी पोलीस ठाणे)
- अजयकुमार राठोड (नियंत्रण कक्ष – देहूरोड पोलीस ठाणे)
- अश्विनी उबाळे (नियंत्रण कक्ष – पिंपरी पोलीस ठाणे)
- प्रकाश कातकाडे (नियंत्रण कक्ष – चाकण पोलीस ठाणे)
- नाईद शेख (नियंत्रण कक्ष – शिरगाव परंदवडी पोलीस ठाणे)
- वैशाली गुळवे (नियंत्रण कक्ष – दिघी पोलीस ठाणे)
महत्वाच्या बातम्या-
-उद्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या महत्वाची पत्रकार परिषद
-‘पुण्यात वॉशिंग मशीन नकोच’; शरद पवारांनंतर वसंत मोरे राऊतांच्या भेटीला
-‘निलेशला मीच पक्षात आणलं, मनापासून आधार दिला’; लंकेंच्या पक्षप्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया
-“माझ्या मतदारसंघात दमदाटी कराल तर गाठ माझ्याशी”; सुप्रिया सुळेंचा अजितदादा गटाला इशारा
-“उद्या म्हणाल अजितदादांच्या शिपायाला मत द्या, नीच प्रवृत्ती असलेले समाजात..” शिवतारे पुन्हा आक्रमक