पुणे : अलिकडच्या काळात आंतरजातीय विवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे. आंतरजातीय विवाहाला कुटुंबातील सदस्यांची सहमती नसल्यामुळे अनेकदा भांडणाचे प्रकार समोर आले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणार्या जोडप्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी शासकीय विश्रामगृहावरील एक कक्ष आरक्षित राहणार आहे.
आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण देण्याबाबत १३ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. त्यामध्ये आज शासनाने सुधारणा केली आहे. या सुधारित परिपत्रकानुसार, अशा जोडप्यांच्या सुरक्षेबाबत करण्यात येणार्या उपाय योजना स्पष्ट केल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. अशा जोडप्यांना सुरक्षा देण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षागृहाची व्यवस्था केली जाणार आहे. हे सुरक्षागृह शासकीय विश्रामगृहात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या कक्षाचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, त्या कक्षातील सदस्यांची नावे ही सर्व अद्ययावत माहिती जिल्हानिहाय पोलीस महासंचालक तसेच संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असा विवाह करणाऱ्या जोडप्यांना काही काळासाठी सुरक्षित राहण्याची व्यवस्था व्हावी याकरिता आता सुरक्षागृहे उभारण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरी-चिंचवडमध्ये बांगलादेशी, रोहिंग्यांवर होणार कारवाई; आमदार लांडगेंनी सभागृहात वेधले लक्ष
-उद्धव ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट; बंद दाराआड नेमकं घडलं काय? चर्चेला उधाण
-पुणे पुस्तक महोत्सवाचा महाकुंभ! पुणेकरांसह देशभरातील वाचनप्रेमींना घातली भुरळ
-पुणेकरांनो सावधान! अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणं पडणार महागात; वाचा काय आहे शिक्षा?
-कात्रज चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार; पालिका आयुक्तांनी घेतली महत्वाची बैठक