पुणे : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येऊ लागली तसा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमधील अनेक इच्छुकांनी बंडाच निशाण फडकवत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशातच आता पुण्यातील काँग्रेसच्या बंडखोरांवर पक्षाकडून कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. पुण्यातील ३ मतदारसंघात काँग्रेसच्या इच्छुकांनी बंडखोरी केली आहे.
शहरातील शिवाजीनगर मतदारसंघातून मनिष आनंद, कसबा पेठ मतदारसंघातून कमल व्यवहारे आणि पर्वती मतदारसंघात आबा बागूल यांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरांना आज शहर काँग्रेसकडून नोटीस पाठवण्यात येणार असून त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात आजपासून सहभागी व्हावे अशी सूचना करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या हे बंडखोर प्रचारात सहभागी न झाल्यास त्यांच्याबद्दलचा अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला पाठवण्यात येणार असून त्यांच्यावर उद्या किंवा परवा पक्षातून निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, पुण्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची बैठक होणार असून या बैठकीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवकपदाची उमेदवारी न देण्याचा ठराव करण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी आज ४ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Assembly Election: ‘पुण्यातील सर्व जागांवर महायुतीच जिंकणार’; पंकजा मुंडेंचा विश्वास
-पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवाराने थेट निवडणूक अधिकाऱ्याची गाडीच पेटवली; धक्कादायक कारण आलं समोर
-‘चंद्रकांत पाटलांच्या रुपात कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला!’ डॉ. माशेलकरांकडून कौतुक
-‘कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच’ असं म्हणणाऱ्या नाना काटेंची निवडणुकीतून माघार
-शरद पवारांचा ‘मावळ पॅटर्न’ होणार सक्सेस? राज ठाकरेंचा बापू भेगडेंना पाठिंबा, शेळकेंची डोकेदुखी