पुणे: शिक्षणामुळेच आपल्या कुटुंबासोबतच देशाची प्रगती होत असते. परंतु काही वेगवेगळ्या अडचणींमुळे शिक्षण घेण्यात अडथळा निर्माण होतो. अशावेळी समाजामध्ये काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात देण्याची गरज असते. हेच काम इन्फोलिड फाउंडेशनच्यावतीने करण्यात येत आहे. इन्फोलिडकडून मातोश्री रमाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
स्वप्न पाहणार्या विद्यार्थ्यांच्या पंखामध्ये बळ देण्यासाठी इन्फोलिड फाउंडेशनकडून मातोश्री रमाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना लागणार्या शैक्षणिक सुविधा पुरवण्यात येत आहेत. फाउंडेशनच्या मदतीने विद्यार्थ्यांच्याकरिता वॉशरुम बांधून देण्यात आले आहे. याच बरोबर शैक्षणिक उपक्रमाच्या मदतीकरिता फाउंडेशन पुढाकार घेत असून शाळेमध्ये नुकताच एक कार्यक्रम देखील पार पडला.
यावेळी फाउंडेनशनचे सीईओ देवानंद आडाव , सुमित परब, चैताली कुसळकर, दामिनी गायकवाड, सोनल भोसले, हर्षल गुरव अमन शेख, शंतनू खंडागळे, किरण पवार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अश्विनी वाघ, स्वप्निल धात्रक, विशाल शहा, पूजा शहा, महालक्ष्मी एज्युकेशन सोसासयटी पुणेचे अध्यक्ष कादर शेख, मुख्याध्यापिका शबाना शेख सहशिक्षक अमोल शिंदे, दीपाली कारंडे, अनिता शिंदे, पल्लवी सकट, आवेज शेख, शकील शेख आदी उपस्थित होते.