पुणे : पिंपरी शहरातील मोरवाडी परिसरात मोकळ्या जागेतील औद्योगिक कचऱ्याला बुधवारी दुपारी आग लागली. न्यायालयाच्या मागील बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत औद्योगिक कचरा म्हणजे रबर, प्लास्टिक सारख्या कचऱ्यामुळे हवेत धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत.
मोरवाडी न्यायालयाच्या इमारतीच्या मागील बाजूला रिकामे मैदान आहे. त्या मैदानात औद्योगिक कचरा टाकला आहे. त्यामध्ये रबर, प्लास्टिक साहित्य होते. दुपारी या कचऱ्याला आग लागली. आग मोठ्या प्रमाणात धुमसत होती. परिसरात सगळीकडे धुराचे लोट सर्वत्र पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आग लागलेल्या परिसरामध्ये जवळच एम्पायर इस्टेट इमारतीमध्ये देखीले हा धूर पसरला. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. शहरातील सर्व अग्निशमन पथके घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न केले.
पीएमआरडीए, एमआयडीसी, टाटा मोटर्सचे बंबही बोलविले होते. आग आटोक्यात आली असल्याचे अग्निशम विभागाकडून सांगितले. पिंपळे सौदागर संरक्षण हद्दीतील मोकळ्या मैदानावरील गवताला आग लागली होती. ती आग देखील आटोक्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“अजितदादा भाजपसोबत गेले म्हणून त्यांची व्होट बँक कमी झाली”
-पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जचे धागेदोरे दिल्लीतही; आतापर्यंत २ हजार किलो ड्रग्ज जप्त
-पुण्यात जप्त केलेल्या ड्रग्जचे सांगली कनेक्शन!; पुणे पोलिसांकडून कसून चौकशी
-लोकसभा उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये ३ नावांची चर्चा; धंगेकरांना उमेदवारी देण्याची समर्थंकांची इच्छा
-अजित पवारांचा पुतण्या शरद पवारांसोबत; रोहित पवार म्हणाले, ‘आम्ही…’