पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरापालिकेच्या यमुनानगर रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. निगडीमधील येथील पिंपरी पालिकेच्या यमुनानगर रुग्णालयामधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेची वार्डामध्येत प्रसूती झाली आहे. यावरुन संबंत डॉक्टर आणि परिचारिकेची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महिलेच्या नातेवाईकांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
गर्भवती महिलेच्या पोटात दुखू लागल्याने नातेवाईकांनी महापालिकेच्या यमुनानगर रुग्णालयात दाखल केले. तब्बल ३ ते ४ तास होऊन त्या महिलेकडे डॉक्टर, परिचारिकेने लक्ष न दिल्याने त्या महिलेची वाॅर्डातील बेडवर प्रसूती झाली. तेथील डाॅक्टर आणि परिचारिकेने दुर्लक्ष केल्याने हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी महिलेचे नातेवाईक दीपक खैरनार यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी तक्रार दिली.
खैरनार यांनी महापालिकेकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘माझी वहिनी हिना खैरनार यांना निगडीमधील महापालिकेच्या यमुनानगर रुग्णालयातील प्रसूती विभागात सकाळी ११ वाजता प्रसूतीसाठी दाखल केले होते. यावेळी वहिनीसोबत माझी आई अन्नपूर्णा खैरनार या उपस्थित होत्या. प्रसतिगृहातील डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हिना खैरनार यांच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर, त्यांना महिला वॉर्डातील बेड देण्यात आला. दुपारी ४ वाजल्यानंतर हिना यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या. परंतु, रुग्णालयातील कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही.
रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर ३ ते ४ तासांपेक्षा जास्त वेळ होऊनदेखील त्रास न थांबल्याने रात्री आठच्या सुमारास दीपक यांच्या आईने रुग्णालयातील डॉक्टर महेश दणाणे यांना सांगितले. मात्र, त्यांनी अजून २ तास तरी प्रसूतीला लागतील. तुम्ही तुमच्या बेडवर जाऊन बसा, असे डॉक्टरांनी आईला सांगितले. यावेळी वॉर्डात अन्य परिचारिका उपस्थित होत्या. यावेळी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हिना यांना प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यानंतर महिला वॉर्डातल्या बेडवरच त्यांची प्रसूती झाली. सुदैवाने माता आणि नवजात बालकाच्या जीविताला गंभीर धोका झाला नाही.
दरम्यान, या घडलेल्या प्रकारानंतर नातेवाईकांनी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना संपर्क साधत घडलेला संपूर्ण हकीकत फोनवरून सांगितली आहे. त्यानंतर आयुक्तांनी त्यावर कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे महिलेचे नातेवाईक दीपक खैरनार यांनी महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी यांना लेखी तक्रार करत संबंधित डॉक्टर, परिचारिका यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यावर आता पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन काय पाऊले उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Zika Virus: पुण्यात झिकाचा धोका वाढला; आणखी २ गर्भवती महिलांना संसर्ग
-सभागृहात मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन भास्कर जाधवही संतापले; म्हणाले, “चेंबरमध्ये बसून लोकांचे…”
-अजित पवार गटातील नेते शरद पवार गटात येणार? शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट