पुणे : पुणे शहरात झालेल्या कल्याणीनगर येथे अपघातानंतर इंदापूरच्या तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. यावरुन राष्ट्रवाद काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी तहसीलदार यांच्या फोडलेल्या गाडीचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच या घटनेचा निषेधही व्यक्त केला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणाला होतात की,’गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’ गृहमंत्री महोदय…. गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जात आहेत… रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही.. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाही.. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही! कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता… आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या!, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’
गृहमंत्री महोदय…. गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत… रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही.. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही… pic.twitter.com/5KTBQyl5KV
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 24, 2024
इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. इंदापूर शहरातील एका चौकात अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला आहे. श्रीकांत पाटील यांच्या सरकारी वाहनावर हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. तसेच डोळ्यात मिरचीची पूड टाकण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. इंदापूरात थेट तहसीलदारांवरच गंभीर हल्ला झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणावर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हल्ल्याचा निषेध केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सेना-भाजपमध्ये ठिणगी; ‘अमित शाहांनी आम्हाला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिलंय, त्यामुळे दरेकरांनी….’
-अक्रोड खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? अक्रोडाच्या सेवनाचे उन्हाळ्यात होतो अधिक फायदा
-Pune Hit & Run: नातवाला वाचवण्यासाठी ड्रायव्हरला घरात डांबलं, आता पोलिसांनी आजोबालाच….
-ब्रेकिंग: हिट अँड रन प्रकरणातील दिरंगाई भोवली, येरवडा पोलीस ठाण्यातील २ अधिकारी निलंबित