पुणे | इंदापूर : येत्या काही दिवसांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. यातच आज भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार असल्याचं पत्रकार परिषद घेत जाहीर केलं आहे. यामुळे आता भाजपला मोठा धक्का बसला असून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये इंदापूरच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय घडामोडी पहायला मिळणार आहेत. पत्रकारांशी बोलताना पाटीलांनी पक्षप्रवेशाच्या तारखेबद्दल देखील भाष्य केलं आहे.
माध्यमांनी पाटलांना विचारलं पक्षप्रवेशाची तारीख काही ठरली आहे का? त्यावर पाटील म्हणाले की, हा निर्णय वैयक्तिक माझा आहे. आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुहूर्त अजून ठरला नाही. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रियाताई आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे याबाबत निर्णय घेतील. हा निर्णय घेण्याचा अधिकार माझा नाही.’
हर्षवर्धन पाटलांच्या या भूमिकेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील त्याच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबाचे आणि पवार कुटुंब यांचे सहा दशकांचे संबंध आहेत. हर्षवर्धन पाटील हे पुन्हा आमच्याकडे येत आहेत, याचा आम्हाला आनंदच आहे. मधल्या काळात विचार वेगळे झाले होते, मात्र आमचे संबंध कायम होते’, असं सुप्रिया सुळे हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयावर म्हणाल्या. तसेच शरद पवार यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया देत म्हंटलं आहे की, ‘हर्षवर्धन पाटील जर राष्ट्रवादीची विचारधारा मांडत असतील तर ते केव्हाही पक्षात येऊ शकतात, त्याचं स्वागत होईल’.
महत्वाच्या बातम्या-
-हर्षवर्धन पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; सांगितलं फडणवीसांसोबतच्या बैठकीत सत्य
-हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या,
-‘राम कृष्ण हरी’ म्हणत पाटील वाजवणार ‘तुतारी’; पत्रकार परिषद घेत जाहीर केला निर्णय
-हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी? पवारांचे निष्ठावंत दुखावले, मानेंची आक्रमक भूमिका