इंदापूर | पुणे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. मात्र, हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर उमेदवारी देण्याचेही संकेत दिले आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे इंदापूरमधील स्थानिक नेते नाराज झाले होते. त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, सोनाईचे संचालक प्रवीण माने, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांचा हिरमोड झाला आहे.
शरद पवार, सुप्रिया सुळे आमचे काल, आज आणि उद्याही दैवत राहतील. मी त्यांना सल्ला देण्याइतपत मोठा नाही. हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. आम्ही सर्वजण बसून हा निर्णय घेऊ. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुक्यात प्रेम असेल, तर निर्णय बदलावा लागेल. अन्यथा इंदापूरची बंडखोरी परडवणार नाही, असा इशारा आप्पासाहेब जगदाळे यांनी दिला आहे.
“लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना २६ हजारांचं मताधिक्य दिलं आहे. त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं इंदापूर तालुक्यावर प्रेम असेल, तर उद्याचा निर्णय बदलावा लागेल. या माणसापाशी (हर्षवर्धन पाटील) काय जडलं आहे?”, असं म्हणत आप्पासाहेब जगदाळे यांनी हर्षवर्धन पाटलांवर टीकास्त्र सोडले.
दरम्यान, दशरथ माने, आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने यांनी इंदापुरमध्ये भव्य मेळावा घेत प्रचंड शक्तिप्रदर्शन केले. या मेळाव्याला प्रचंड गर्दी जमली. तसेच यावेळी माने आणि जगदाळेंनी उमेदवारीचा निर्णय बदलला नाही तर बंडखोरी करु, अपक्ष उमेदवार देऊ, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. यावर आता काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बोपदेव घाट प्रकरणी तिन्ही नराधमांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; अद्याप अटक नाही
-ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार हाती घड्याळ घेणार! शरद पवारांच्या आमदाराला देणार टक्कर
-डेक्कनमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत महापालिकेचा ‘हा’ मोठा निर्णय
-बोपदेव घाट प्रकरणातील एक नराधम पोलिसांच्या ताब्यात; आणखी दोघांचा शोध सुरु