इंदापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमध्ये शुक्रवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत. महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटालांनी फडणवीसांच्या सभेआधीच मोठं वक्तव्य केलं आहे.
अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये राजकीय वैर होतं. हे वैर फडणवीसांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची नाराजी काढल्यानंतर प्रथमच भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. फडणवीसांच्या इंदापूर मेळाव्यापूर्वीच हर्षवर्धन पाटलांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.
“फडणवीसांकडे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या व्यथा मांडल्या. त्यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते. मागच्या घटना का घडल्या? हे फडणवीसांना माहीत नव्हते, त्या त्यांना सांगितल्या. दिल्लीतून निरोप आला आणि एकत्र बसायला सांगितले होते. यातून देवेंद्र फडणवीस तोडगा काढतील. आमचा आणि राष्ट्रवादीचा २० वर्षांचा संघर्ष आहे. आता राजकीय समीकरण बदलली आहेत. लोकसभा झाल्यावर हे उद्भवू नये ही जर उद्भवली तर काय करायचं? ज्यांच्यासाठी आज आम्ही करतो आहे. त्यांनी आमच्यासाठी भविष्यात काम करावं लागेल ना? हे साहजिकच आहे”, हे सांगताना हर्षवर्धन पाटलांचा रोख अजित पवारांकडे होता.
“देवेंद्र फडणवीस यांचा मेळावा उद्या इंदापुरात आहे. आम्ही महायुतीचे काम सगळ्यांनी करायचं आहे. पण महायुतीचे पथ्य सगळ्यांनी पाळले पाहिजे. आमचे काही प्रश्न आहे ते आमचे कार्यकर्ते मांडतील. आजपर्यंत भाजप लढणार असे वाटत होते त्यानुसार काम करीत होतो पण समिकरणे बदलली. आज आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय हा अन्याय आमच्याच महायुतीतील मित्र पक्ष करीत आहेत. त्याची जबाबदारी घ्यावी, देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व घेतले आहे”, असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-निवडणूक आयोगाने घातल्या खर्चाच्या मर्यादा; प्रचारात उमेदवारांना महागड्या गाड्या वापरणं पडणार महागात
-‘काँग्रेसची गॅरंटी म्हणजे चायना मालासारखीच‘; भाजप नेत्याची खरमरीत टीका