पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इंदापूर विधानसभा निवडणुकीत घडामोडींना वेग आला आहे. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे आप्पासाहेब जगदाळे हे नारज असून लवकरच ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ सोडणार असल्याचे बोलले जात आहे. तर माजी नगराध्यक्ष भरत शहा आणि प्रवीण माने हे देखील नाराज असून मानेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचे टेंशन वाढले होते. मात्र शरद पवार हे रविवारी हर्षवर्धन पाटलांसाठी हे मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले.
शरद पवारांनी रविवारी भरत शहा यांची सदिच्छा भेट घेतली असून भरत शहा आणि त्यांच्या बंधूंसोबत शरद पवारांनी बंद दाराआड चर्चा केल्या आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांना काहीसा दिसाला मिळाला आहे. शरद पवारांनी शहांची भेट घेतल्यानंतर शहा हे पवारांची साथ देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
इंदापूरचे माजी नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. शहा यांच्या कुंटुंबियांना आणि मित्रपरिवाराला यानिमित्ताने भेटता आले. pic.twitter.com/tWVPdGyjnJ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 3, 2024
दरम्यान, आज निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून शरद पवार आणि भरत शहांच्या भेटीनंतर बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रवीण माने आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मानेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर हर्षवर्धन पाटलांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, मानेंनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही तर इंदापूरात तिरंगी लढत पहायला मिळेल. हर्षवर्धन पाटलांना या बंडखोर उमेदवारीचा मोठा फटका बसणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शरद पवार आता मानेंची उमेदवारी मागे घेण्यात यशस्वी होणार का हे पाहणं देखील महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Assembly Election: बंडखोर झाले नॉटरिचेबल; कसब्यात धंगेकरांची धाकधूक वाढली
-‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’ आबा बागुलांच्या समर्थनार्थ मतदारसंघात बॅनरबाजी
-नाना काटेंचं बंड शमवण्यासाठी अजित पवारांकडून शर्तीचे प्रयत्न; नाना काटे माघार घेणार का?
-“…त्याला उमेदवारी देताना स्वाभिमान कुठं ठेवला?”; विजय शिवतारेंचा अजितदादांना सवाल
-लोकसभेला रान उठवलं, पण आता अजितदादा घेणार बदला? पुरंदरच्या मैदानात शिवतारेंविरोधात उतरवला उमेदवार