पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या इंदापूर विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या त्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. इंदापूरमध्ये यंदा तिरंगी लढत पहायला मिळत आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे तर शरद पवारांनी उमेदवारी न दिल्याने बंडखोरी करणारे प्रवीण माने हे अपक्ष निवडणूक लढत आहेत. त्यामुळे या तिरंगी लढतीत चांगलीच रंगत आली आहे.
दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे कट्टर राजकीय विरोधक असून यांच्या माध्यमातून इंदापूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगला असून दोन्ही पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
1995 ते 2004 पर्यंत इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांचा दबदबा होता. हर्षवर्धन पाटील यांनी सलग 3 निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. इंदापुरातील राजकारणात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. 2009 मध्ये, हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळी त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली. या वेळीही त्यांना विजय मिळाला. मात्र, 2014 आणि 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांनी विजय मिळवला.
दरम्यान, मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर आता हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले अन् उमेदवारीही मिळवली. त्यामुळे आता दत्तात्रय भरणे जागा राखणार की, हर्षवर्धन पाटील गड हिसकावणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-बालेकिल्ल्यात दोन्ही राष्ट्रवादीची प्रतिष्ठेची लढाई; पिंपरी विधानसभेवर कोण आपला झेंडा रोवणार?
-वडगाव शेरीत महायुतीला मोठा धक्का; माजी नगरसेविका टिंगरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
-“दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठाचा निर्णय घेता आल्याचा आनंद”- चंद्रकांत पाटील
-शरद पवारांची मानसपुत्र वळसे पाटलांच्या मतदारसंघात जंगी सभा; आंबेगावमधून तुफान फटकेबाजी
-मिळकतकरात पुन्हा मिळू लागली ४० टक्के सूट, रासनेंच्या पाठपुराव्याला कसब्याची जनता पोचपावती देणार