पुणे : पुणे शहरात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराचे २४ संशयित रुग्ण आढळले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’चे रुग्ण अचानक वाढू लागल्याने आरोग्य विभागाने शीघ्र पथकाची स्थापना केली आहे. या आजाराच्या संशयित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ नोंदविण्यात आली आहे. हे सर्व रुग्ण शहरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. या २४ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले असून तपासणी अहवाल मिळेपर्यंत हे रुग्ण कोणत्या आजाराचे हे स्पष्ट करता येत नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये- १०, सह्याद्री (डेक्कन)- १, भारती रुग्णालय- ३, काशीबाई नवले रुग्णालय- ४,पूना हॉस्पिटल- ५ आणि औंधमधील अंकुरा हॉस्पीटलमध्ये १ अशा रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा आजार तरुणांमध्ये होत असून या आजाराला जास्त घाबरुन न जाता काळजी घेणं महत्वाचं आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. एकूण २४ संशयित रुग्ण असून, त्यातील दोघे व्हेंटिलेटरवर आहेत. तर, ८ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून यांचे नमुने तपासण्यासाठी एनआयव्ही पाठविण्यात आले आहे.
तपासणी अहवाल मिळेपर्यंत हे रुग्ण कोणत्या आजाराचे हे स्पष्ट करता येत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी याप्रकरणी ‘शीघ्र कृती पथक’ स्थापन करण्याचा आदेश काढला आहे. या पथकामध्ये राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब तांदळे, आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते आणि औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नागनाथ रेडेवार, राज्य साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू सुळे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. अभय तिडके, राज्य साथरोगतज्ज्ञ डॉ. भालचंद्र प्रधान, पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे आणि सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ डॉ. अमोल मानकर यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महाकुंभमेळ्याचा प्रवास महागला; विमानाच्या तिकीटदरात चौपट वाढ, मोहोळ काय म्हणाले?
-खंडणी प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक; ओबीसी नेते हाके, सानप यांच्यावर गंभीर आरोप
-घटस्फोटाचं धक्कादायक कारण आलं समोर; लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिने…
-पुणे महापालिकेची निवडणूक कधी होणार? न्यायालयातील सुनावणी संदर्भात महत्त्वाची अपडेट