पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व इच्छुकांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. पुणे शहरातील पर्वती मतदारसंघात तर इच्छुकांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे महायुतीमध्ये विद्यमान आमदार माधुरी मिसाळ आणि पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले या दोघांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. तर अशातच काँग्रेसकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे पालिकेचे माजी उपमहापौर आबा बागुल हे देखील इच्छुक आहेत.
पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आबा बागुल यांना विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देणारे बॅनर झळकत आहेत. ‘जनतेच्या मनातील आमदार, आमच्या आबांचे काम दमदार, नाते विश्वासाचे, कार्य विकासाचे’ अशा आशयाचे पोस्टर पर्वती मतदारसंघात सर्वत्र लावल्याचे पहायला मिळत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आबा बागुल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेत, पर्वतीतून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. त्यावर एकदा संधी द्या, आमदार होऊनच दाखवतो, असं म्हणाले होते. यावर आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये पर्वतीतून काँग्रेसला जागा मिळते का? आणि आबा बागुल यांनी उमेदवारी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भक्तांच्या ‘त्या’ मागणीचा ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ने राखला मान, काय होती मागणी?
-अमोल कोल्हेंनी लोकसभेत केली बिबट्याच्या नसबंदीची मागणी; मनेका गांधी म्हणाल्या, ‘त्यापेक्षा..’
-‘देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, पण…’; जरांगे पाटलांचं वक्तव्य
-खडकवासल्यावर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा; भीमराव तापकीरांची डोकेदुखी वाढली!